Suspicious Canva
गोवा

St Estevam Accident: 'तो' बुडून मेल्याची शक्यता फारच दुर्मीळ? घातपाताच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

St Estevam Tragedy: त्या कारमध्ये असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनीच बेपत्ता केले असावे किंवा घातपात केला असावा असा संशय बाशुदेवच्या वडिलांनी व्यक्त केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव्ह येथील कालव्यात बुडालेला कारचालक बाशुदेव भंडारी (वय २२) या तरुणाच्या बेपत्ता होण्याला आणखीन एक वळण मिळाले आहे. बाशुदेवचे पिता नारायण यांनी आपल्या मुलाला, त्या कारमध्ये असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनीच बेपत्ता केले असावे किंवा त्याचा त्यांनीच घातपात केला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. आपण तशी तक्रार जुने गोवे पोलिसात केल्याचे नारायण भंडारी यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला सांगितले.

ते म्हणाले, दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता मला ही गोष्ट समजली. सध्‍या मी माझ्या मुलाचा पोलिस शोध लावतील या आशेवर गोव्यात आहे. मला एकतर माझा मुलगा जिवंत हवा आहे, त्याचे काही बरेवाईट झाले, तर मला मृतदेह दाखवा अशी माझी मागणी आहे. गोव्यात आल्यावर मला त्या मुलीसोबत माझ्या मुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ही बाब समजली. माझ्या मोठ्या मुलाला व मुलीच्या कॅनडात असलेल्या भावाला या प्रेमप्रकरणाची कल्पना होती. मुलीकडच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यातून त्यांनी काही बरेवाईट केले असावे असे मला वाटते.

त्या मुलीकडे बाशुदेवच्या वडिलांचा संपर्क क्रमांक नव्हता. त्यामुळे तिने एका समान मित्राची या प्रकरणात मदत घेतली आणि नारायण यांचा क्रमांक मिळवून पोलिसांना दिला. त्यानंतर नारायण यांना या घटनेची माहिती दिली, असे नारायण भंडारी यांनी सांगितले.

नारायण हे भडोच येथे राहतात, तर बाशुदेवचे कार्यक्षेत्र अहमदाबाद आहे. या दोन्ही शहरांत २०० किलोमीटरचे अंतर असल्याने त्यांना या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती. त्या मुलीने गेल्या जुलैमध्ये साखळी येथील गोवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिला भेटण्यासाठीच बाशुदेव गोव्यात आला होता.

तिला पणजीहून साखळीला सोडण्यास जाताना हा अपघात झाला. मात्र, बाशुदेव याला पोहता येत असल्याने तो बुडून मरण पावल्याची शक्यता फारच दुर्मीळ आहे, असे नारायण यांचे म्हणणे आहे. सध्या ते एक भाड्याची दुचाकी घेऊन जुने गोवे ते पणजी अशा फेऱ्या मारून आपल्या मुलाचा काही शोध लागतोय का याचा पाठपुरावा करत आहेत.

...आणि पायाखालची जमीनच सरकली

नारायण भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाशुदेव व ती मुलगी अहमदाबाद विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्र पदवी अभ्यासक्रमावेळी एकत्र आले. यंदाच्या मे मध्ये त्यांनी पदवीही घेतली. त्यानंतर बाशुदेव बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप सुरू करून व्यवसाय करत होता. २७ ऑगस्ट रोजी त्याने आपण काही कामानिमित्त गोव्याला जातो, दोन चार दिवसात परत येऊ असा घरी निरोप दिला होता. त्यामुळे तो व्यवसायाच्या निमित्ताने गोव्यात गेला असा कुटुंबीयांचा समज झाला होता. तो बुडाला आणि बेपत्ता झाल्याचा फोन आल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT