Crime|Suspense Canva
गोवा

St Estevam Accident: ..तो पाण्याबाहेर आला की नाही? दोघांचेही फोन कुठे आहेत? अनेक प्रश्न अनुत्तरीत

St Estevam Tragedy: बाशुदेव यांचा मोठा भाऊ याने बाशुदेवच्या प्रेयसीला पोलिसांच्या समक्ष विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Accident Car Incident

पणजी: सांतइस्तेव येथे मांडवी नदीत कार बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी यांचा मोठा भाऊ बलराम याने बुडालेल्या कारमधून बचावलेल्या बाशुदेवच्या प्रेयसीला पोलिसांच्या समक्ष विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत, असे त्याचे म्हणणे आहे. तू मद्यपान करतेस का, या प्रश्नावर त्या युवतीने ‘हो करते, पण ३१ रोजी मी मद्यपान केले नव्हते’, असे उत्तर दिले. ‘तू कार चालवते का’, यावर ‘हो चालवते; पण त्या दिवशी मी चालवत नव्हते’, अशी वरवरची उत्तरे दिली.

बाशुदेव प्यायलेला होता, तर त्यादिवशी तू कार का चालवली नाहीस, या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नसल्याचे बलराम यांचे म्हणणे आहे.

नेपाळमधील पोखरा येथे हॉटेल व्यावसायिक असलेले बलराम आपला भाऊ बेपत्ता झाल्याचे समजल्यावर तडक गोव्यात दाखल झाले. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत बाशुदेव आणि त्या युवतीसोबत काहीवेळा ते गुजरातमध्ये रात्रीचे जेवले देखील आहेत. पोलिसांना त्यांनी त्या युवतीशी एकट्याने बोलू देण्याची विनंती केली होती, ती पोलिसांनी मान्य केली नाही. ज्या रात्री घटना घडली, तेव्हा गाडीसोबत बाशुदेव आणि ती युवती बुडाली.

ती कार किनाऱ्यापासून सहा मीटर अंतरावर पाण्यात गेली. युवतीने पोलिसांत दिलेल्या जबानीनुसार कारचा दरवाजा उघडून आधी बाशुदेव बाहेर आला. त्यामुळे कारच्या एका भागात पाणी शिरू लागले. त्यामुळे बाशुदेव दुसऱ्या बाजूने आला आणि त्याने दरवाजा उघडून युवतीला बाहेर येण्यास मदत केली. ते दोघेही पोहत अर्ध्या वाटेवर आले. याचा अर्थ तीन मीटरचे अंतर त्यांनी कापले होते. सहा फूट उंच आणि पिळदार शरीरयष्टी असलेल्या बाशुदेव याला उर्वरित तीन मीटर अंतर कापणे फारसे कठीण नव्हते, तरीही तो पाण्याबाहेर आला की नाही, याबाबत पुष्टी होत नाही.

बलराम यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर युवतीच्या म्हणण्यानुसार तिने पाचशे मीटरवर असलेल्या घराचा दरवाजा धावत जाऊन मदतीसाठी याचना केली. सावकाश चालत जाऊनही पाच मिनिटांत पोचता येणारे अंतर गाठण्यासाठी त्या युवतीला तब्बल १६ मिनिटे का लागली, हा प्रश्नच आहे. बाशुदेव आणि त्या मुलीचा मोबाईल सापडलेला नाही. बाशुदेवच्या बेपत्ता होण्यामागे कोणते कारण असावे, हेच समजत नाही.

२ सप्टेंबर रोजी परत जाण्यासाठी बाशुदेवने विमानाचे तिकीट काढले होते. त्या विमानाने तो परत गेला नसल्याची खातरजमा करण्यात आली आहे. बलराम यांनी सांतइस्तेव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले आहेत. त्या रात्री जोरदार पाऊस असल्याने मोटारसायकलवरून गेलेल्या व्यक्ती त्यांना ओळखता आलेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूने असलेल्या पुलावरून बाशुदेव बाहेर आला असेल, अशी शक्यता गृहीत धरूनही त्यांनी त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यातही काही आढळले नाही.

बाशुदेवबाबत ‘तिने’ व्यक्त केली अनभिज्ञता

१) बाशुदेव आणि त्या युवतीचा मित्र कल्पराजने युवतीशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. कल्पराज आपल्या प्रेयसीसह गोव्यात आला होता आणि ३१ ऑगस्ट रोजी दुपारी तो गुजरातला परतला होता. कल्पराज याच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात युवतीने आपण अहमदाबाद येथे परतल्याचे नमूद केले.

२) बाशुदेव कुठे गेला, याविषयी मला काहीच माहीत नाही. त्यावेळी पोलिसांना दिलेल्या जबानीशिवाय आपल्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, असेही तिने कल्पराजला सांगितले. बाशुदेव कुठेही असेल तर तो आधी बलराम भाईला संपर्क करेल, असे तिचे म्हणणे होते. तसा संपर्क न केल्याने चिंता वाढल्याचे कल्पराज याने नमूद केले, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT