Bashudev Bhandari Canva
गोवा

St Estevam Accident: प्रेयसीने मध्यरात्री २० मिनिटे कोणाशी गप्पा मारल्या? 'बाशुदेव'च्या मित्राच्या चौकशीतून गूढ उलगडणार

St Estevam Tragedy: बेपत्ता असलेल्या बाशुदेव भंडारी या गुजराती तरुणाच्या कल्पराज या मित्राला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव बेटावरील आखाडा फेरी धक्‍क्यावर कार नदीत गेल्याने घडलेल्या दुर्घटनेनंतर गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाशुदेव भंडारी या गुजराती तरुणाच्या कल्पराज या मित्राला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले आहे. तो बुधवारी (ता.१८) पोलिसांत हजर होणार आहे. कल्पराज नावाचा हा मित्र कार बुडाली, त्याच दिवशी ३१ ऑगस्ट रोजी गोव्यातून आपल्या प्रेयसीसह गुजरातला गेला होता.

आपल्या प्रेमसंबंधाचं तिसरं वर्ष साजरं करण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी बाशुदेव अहमदाबादहून गोव्यात आला. त्याच दिवशी सुरत येथून कल्पराज गोव्‍यात आला होता. त्याचे कांदोळी येथे वास्तव्य होते. २८ रोजी बाशुदेव, त्याची प्रेयसी, कल्पराज आणि त्याची प्रेयसी पणजीतील कॅसिनोत रात्री एकत्र होते.

३१ रोजी दुपारी तो गुजरातला परत गेला. त्याच रात्री बाशुदेव आणि ती युवती साखळी व माशेलदरम्यान जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी त्या युवतीचे पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील; पण तिच्याबरोबर शिकणारे दोन मित्र होते. त्यापैकी एकाशी ती युवती ३१ च्या मध्यरात्री दुर्घटनेनंतर २० मिनिटे बोलली होती. त्यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने तपासकाम पुढे नेले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यात यश येत नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही तपासाची माहिती उघड न करण्याचे निर्देश दिले आहेत. बाशुदेव हा पाण्यात बुडाला असता तर आतापर्यंत त्याचा मृतदेह सापडला असता. मात्र, तो अजूनही सापडत नसल्याने पोलिसांनीही तपासाची दिशा बदलावी की नाही, यासंदर्भात अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत.

कल्पराजवर पोलिसांची भिस्त

कल्पराज हा गुजरातला गेल्यानंतर कार दुर्घटनेतून वाचलेल्या युवतीशी बोलला होता. त्यानंतर त्या युवतीशी मोबाईलवर संपर्क साधता आलेला नाही. ती युवती आणि बाशुदेव यांचा कल्पराज हा मित्र असल्याने तो या प्रकरणावर प्रकाश टाकू शकेल, असे पोलिसांना वाटते.

‘त्या’ युवतीसह भंडारी कुटुंबीयांचीही चौकशी

गेल्या कित्येक दिवसांपासून किनारी पोलिस तसेच नौदलाने मृतदेह शोधण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. बाशुदेव याचा मृतदेह मिळालेला नाही. त्यामुळे त्याचा अपघातात मृत्यू झालाच नाही, अशा निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे ती युवती आणि भंडारी कुटुंबीयांच्या पार्श्‍वभूमीची माहिती पोलिस जमा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT