Police Investigation  Canva
गोवा

St Estevam Accident: पोलिसांचे पुन्हा 'सांतइस्तेव खाडीत' शोध कार्य! युवतीच्या जबाबात मात्र बराच गोंधळ

St Estevam Tragedy: गुजरातमधून कल्पराज चौकशीसाठी एकटाच आल्याने त्याला प्रेयसीला सोबत घेऊन येण्यास सांगितले असून तो पुन्हा गोव्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Incident

पणजी: बेपत्ता बाशुदेवचा शोध घेतला जात असताना पोलिसांनी कल्पराज या बाशुदेव याच्या मित्राची जबानी नोंदवून घेतली आहे. आपल्या प्रेमाचा तिसरा वाढदिन युवतीसह साजरा करण्यासाठी बाशुदेव गोव्यात आला होता. त्यावेळी गुजरातमधून कल्पराज आपल्या प्रेयसीसह आला होता. त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बालविले होते. मात्र, तो चौकशीसाठी एकटाच आल्याने त्याला प्रेयसीला सोबत घेऊन येण्यास सांगितले असून तो येत्या सोमवारी पुन्हा गोव्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली.

सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावरून पाण्यात कार पडल्याने ३१ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या बाशुदेवच्या चौकशीसाठी त्या दुर्घटनेत बचावलेली युवती आज पोलिसांत हजर झाली आहे. त्या युवतीने सुरवातीला दिलेल्या जबानीत आपण मद्यपान केले नसल्याचे म्हटले होते. मात्र, बाशुदेवचे वडील नारायण यांनी संबंधित हॉटेलमधून मिळविलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती युवती मद्यपान करताना दिसत असल्याचे नारायण यांचे म्हणणे आहे.

मित्रासोबत एकाच ताटात भोजन

साखळी ते सांतइस्तेव दरम्यानच्या एका हॉटेलमध्ये बाशुदेव आणि ती युवती रात्रीच्या जेवणासाठी थांबले, तेव्हा तिचे दोन मित्र तेथे आले होते. त्यापैकी एका मित्राच्या ताटातच ती जेवत असल्याचेही सीसीटीव्हीत दिसून आले. हे वर्तन संशय वाढवणारे ठरल्याचे नारायण यांना वाटते.

बाशुदेवचा पुन्हा शोध

बाशुदेवचे वडील नारायण यांनी त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून हरकतीचे मुद्देही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी आज पाच नौका घेऊन चार तास बाशुदेव याचा सांतइस्तेवच्या खाडीत शोध घेतला. या शोध कार्यात बाशुदेव यांचे मोठे बंधू बलराम हेही सहभागी झाले होते.

काही प्रश्‍‍न, संशयाला जागा

१)नारायण आणि बलराम यांनी त्या हॉटेलवर जाऊन सीसीटीव्ही फुटेज मिळविल्यानंतर त्यांनी हॉटेल ते घटनास्थळ किती वेळ लागतो, याची माहिती घेतली.

२) दिवसा रस्त्यावर वाहतूक असूनही त्यांना २५ मिनिटे लागली. असे असताना ३१ ऑगस्टच्या रात्री बाशुदेव आणि त्या युवतीला सांतइस्तेव येथे पोचण्यासाठी ४० मिनिटे का लागली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

३) युवतीने सुरवातीला पोलिसांत दिलेल्या जबानीत आपण ३० ते ४० सेकंदांत पाण्याबाहेर आले, असे म्हटले होते.

४) आताच्या जबानीत पाण्यातच आपण बाशुदेव याचा ३-४ मिनिटे शोध घेत होते, अशी माहिती दिल्याचेही नारायण यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले.

५)पाण्याबाहेर आल्यानंतर केवळ ५०० मीटरवर असलेल्या एका घरात मदत मागण्यासाठी जाण्यास तिला १७ मिनिटे का लागली, याचेही समाधानकारक उत्तर त्या युवतीकडे नव्हते, असे नारायण यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT