Premier League
Premier League Dainik Gomantak
गोवा

Premier League: पणजी जिमखान्याचे विजयासाठी प्रयत्न हुकले

किशोर पेटकर

Premier League of Goa Cricket Association: स्नेहल कवठणकर व शिवेंद्र भुजबळ यांनी चमकदार शतके ठोकताना अडीचशे धावांची भागीदारी केली. त्या बळावर पणजी जिमखान्याने दुसऱ्या डावात २५२ धावांची आघाडी घेतली.

नंतर त्यांनी प्रतिस्पर्धी जीनो स्पोर्टस क्लबचे आठ गडी टिपले, पण तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ संपल्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत त्यांना विजय थोडक्यात हुकला.

सांगे येथील जीसीए मैदानावर तीन दिवसीय सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावात ११८ धावांनी मागे पडलेल्या पणजी जिमखान्याने दुसरा डाव ५ बाद ३७० धावांवर घोषित करून जीनो क्लबसमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले.

स्नेहल (१४९ धावा, १९५ चेंडू, १६ चौकार) व शिवेंद्र (१४५ धावा, २६५ चेंडू, १३ चौकार, ४ षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी केली.

नंतर सत्यजीत बच्छाव (४-६५) व शुभम देसाई (४-४२) यांच्या प्रभावी फिरकीसमोर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जीनो क्लबची ८ बाद १६५ अशी घसरगुंडी उडाली होती.

दर्शन मिसाळने किल्ला लढविताना ६६ चेंडूंत नाबाद २० धावा केल्या, त्यामुळे पणजी जिमखान्याला स्पर्धेतील पहिला विजय शक्य झाला नाही.

चिखली वास्को येथील मैदानावर मडगाव क्रिकेट क्लब व धेंपो क्रिकेट क्लब यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील ३९ धावांच्या आघाडीमुळे मडगावच्या संघाला तीन गुण मिळाले.

संक्षिप्त धावफलक

१) पणजी जिमखाना, पहिला डाव ः १४१ व दुसरा डाव (३ बाद १५६ वरून) ः ९० षटकांत ५ बाद ३७० घोषित (स्नेहल कवठणकर १४९, शिवेंद्र भुजबळ १४५) अनिर्णित विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २५९ व दुसरा डाव ः ३९ षटकांत ८ बाद १६५ (ज्योत्सिल सिंग ४६, शाश्वत रावत ४६, आनंद तेंडुलकर २३, दर्शन मिसाळ नाबाद २०, सत्यजीत बच्छाव ४-६५, शुभम देसाई ४-४२).

२) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ३१८ व दुसरा डाव (१ बाद २२ वरून) ः ६९.२ षटकांत सर्वबाद २१७ (अभिनव तेजराणा २५, योगेश कवठणकर ३९, सनथ नेवगी ३७, यश गाडिया ३५, रोहन बोगाटी २-४४, पार्थ साहनी ४-७०, दीप कसवणकर २-२०) अनिर्णित विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः २७९ व दुसरा डाव ः २६ षटकांत ५ बाद १७१ (अजय रोहेरा ७२, पार्थ साहनी २५, विकास सिंग नाबाद ३७, फेलिक्स आलेमाव ३-५१).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT