Covid Vaccination Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

परिसरातील जवळपास 70 टक्के मुलांनी घेतला पहिला डोस

दैनिक गोमन्तक

डिचोली: बारा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या वयोगटातील जवळपास 70 टक्के मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसासह कालपासून दुसरा डोस देण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. अशी माहिती सामाजिक आरोग्य केंद्रातून मिळाली आहे. ''कोविड'' महामारीपासून लहान मुलांना सुरक्षा मिळावी म्हणून 12 ते 14 वर्षापर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना लस देण्यात यत आहे. गेल्या महिन्यापासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या अखात्यारीत येणाऱ्या विविध शाळांतील मिळून एक हजार 576 विद्यार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत (ता.19) एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर कालपासून दुसरा डोस देण्यास सुरवात झाली आहे. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालू आहे. आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यास कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

SCROLL FOR NEXT