Speeding up stalled pre-monsoon works Cleaning  drain municipal elections
Speeding up stalled pre-monsoon works Cleaning drain municipal elections Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim : साखळीत रखडलेल्या मॉन्सूनपूर्व कामांना गती

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : वाळवंटी नदीला साखळी बाजारातून जोडणाऱ्या नाल्याच्या साफसफाईचे काम जलस्रोत खात्यातर्फे खास यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. नगराध्यक्षपदाचा ताबा घेताच रश्मी देसाई यांनी जलस्रोत खात्याला लागलीच पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत खात्यातर्फे या नाल्याच्या साफसफाईला प्रारंभ करण्यात आला. पालिका निवडणकीमुळे रखडलेल्या मॉन्सूनपूर्व कामांना गती मिळाली आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, जलस्रोत अभियंता विनोद भंडारी, कंत्राटदार तानाजीराव देसाई, बाजार निरीक्षक बसप्पा आदींची उपस्थिती होती.

साखळी बाजारातील याच नाल्यातून संपूर्ण साखळी बाजार व इतर परिसरातील पाणी वाळवंटी नदीत जात असते. याच नाल्यातून नदीचे पाणी बाजारात येण्याची शक्यता असते. त्यासाठी नदीचे पाणी वाढल्यानंतर याच नाल्याच्या नदीला जोडणाऱ्या मुखावर गेटस् घालून पाणी रोखले जाते.

व नाल्यात साचणारे पाणी पंपींगद्वारे नदीत सोडले जाते. या पूरप्रतिबंधक योजनेअंतर्गत हा नाला सर्वात महत्वाची कामगिरी बजावतो. त्यासाठी तो पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफ करणे आवश्यक असते.

मॉन्सूनपूर्व कामांना वेग

नगरपालिका निवडणुकांमुळे सर्व प्रभागांमधील मॉन्सूनपूर्व कामांकडे लक्ष देणे, साकळी पालिकेला शक्य झाले नव्हते. निवडणूक झाल्यानंतर लगेच नगराध्यक्षा देसाई यांनी कामांचा आढावा घेऊन मॉन्सूनपूर्व कामांना वेग दिला आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी साचून लोकांना त्रास होणार नाही. याची खबरदारी साखळी नगरपालिका घेणार आहे, असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT