Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे निधन, आवश्यक पुराव्यांचा अभाव; लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निर्दोष

Goa Crime News: पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात पीडिता गोव्यातून गायब झाली होती.

Sameer Panditrao

पणजी: बलात्कारप्रकरणाच्या आरोपपत्रातील मुख्य साक्षीदारांचेच खटल्यावरील सुनावणीवेळी निधन झाल्याने तसेच पीडिता न्यायालयात जबानीसाठी हजर न राहिल्याने पणजी विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीची पुराव्याअभावी निर्दोषमुक्तता केली.

उत्तर गोव्यात एका गावात शेजारी राहत असलेल्या इसमाविरोधात १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सप्टेंबर २०२५ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली होती.

पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात पीडिता गोव्यातून गायब झाली होती व तिचा ठावठिकाणा तिच्या आईलाच माहित नव्हता त्यामुळे पोलिस तिला न्यायालयात जबानीसाठी उपस्थित करू शकले नाहीत. संशयिताने तिला आपल्या घरी बोलावून नेल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला तिचे वडील व शेजारी वृद्धेचे निधन झाले.

पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून आवश्‍यक पुरावे तसेच पीडितेचे कपडेही खटल्यावरील सुनावणीवेळी सादर करण्यात आले नाहीत. तिच्यावर संशयिताने बलात्कार केल्याचा वैद्यकीय अहवालात उघड झाले नाही. त्यामुळे संशयिताने बलात्कार केल्याचा गुन्हा या पुराव्याअभावी सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवताना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT