Speaker Ramesh Tawadkar And Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

आमदार अपात्रता याचिका; निकालापूर्वीच चोडणकरांना सतावतेय चिंता, सभापतींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

MLA Disqualification Petition: आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापतींनी देतील तो निर्णय सत्याच्या तत्त्वांच्या आणि संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या विरुद्ध असेल; चोडणकर.

Pramod Yadav

MLA Disqualification Petition

पणजी: आमदार अपात्रता याचिकेवरील निकालाची सुनावणी आज (०१ नोव्हेंबर) सभापती रमेश तवडकर जाहीर करणार आहेत. निकालापूर्वीच काँग्रेसच्या गिरीष चोडणकरांनी या निकालाबाबत चिंता व्यक्त केली असून, सभापतींच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सभापतींचा निकाल सत्य या तत्त्वांच्या आणि संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या विरुद्ध असेल, अशी भीती चोडणकरांनी व्यक्त केलीय.

आमदार अपात्रता याचिकेवर आज (०१ नोव्हेंबर) सभापती रमेश तवडकर सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास निकाल जाहीर करणार आहेत. निकालापूर्वी चोडणकरांनी त्यांच्या याचिकेवरील निकालाबाबत शंका उपस्थित केली आहे. याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर एक मोठी पोस्ट लिहली आहे.

“आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापतींनी देतील तो निर्णय सत्याच्या तत्त्वांच्या आणि संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या विरुद्ध असेल.”

“गेल्या दोन वर्षांतील माझी याचिका त्यांनी हाताळली असता, सभापतींचा आदेश सत्याच्या तत्त्वांचा आणि संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या आत्म्याशी तडजोड करु शकतो अशी मला गंभीर चिंता आहे. सभापतींनी दोन वर्षे सुनावणी लांबवली, केवळ सुनावणी सुरक्षित ठेवण्यासाठी मला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास भाग पाडले. त्यांनी केलेली कृती हेतुपुरस्सर वाटते.”

“राजकीय पक्षांचे विलीनीकरण हे भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येते, सभापतींच्या नाही. भारतात, राजकीय पक्षांचे विलीनीकरण करण्याचा अधिकार सभापतींना देणारा कोणताही कायदा नाही.

पक्षांतर विरोधी कायदे केवळ त्या प्रक्रियेची रूपरेषा देतात ज्याद्वारे आमदारांना एका याचिकेच्या आधारे विधानमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्याने पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरवले जाऊ शकते. न्यायाधिकरण म्हणून सभापतींची भूमिका पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांकडे लक्ष देण्यापुरती मर्यादित आहे. पाच वर्षांच्या विधानसभेच्या कार्यकाळात दोन मौल्यवान वर्षे सभापतींच्या बेशिस्तपणामुळे वाया गेली,” अशी टीका चोडणकरांनी त्यांच्या पोस्टमधून केलीय.

'सर्वोच्च न्यायालय अखेरीस या प्रकरणावर निर्णय घेईल आणि गोव्यातील आठ पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवेल आणि या प्रदीर्घ समस्येला पूर्णविराम देईल', असा विश्वास देखील चोडणकरांनी या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. दरम्यान, सभापती तवडकर सायंकाळी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT