Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar : संबंधितांचे बेकायदा व्यवहार बंदीमुळेच आरोप

सभापती रमेश तवडकर : अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

काणकोणातील वृक्षतोड प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांच्या विरोधात दक्षिण गोवा वनपालाकडे तक्रार केलेल्या कॉंग्रेसचे नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याची घोषणा सभापती तवडकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

काणकोणमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जुगार चालू आहेत, त्यात जनार्दन भंडारी व त्यांच्या साथीदारांचा हात आहे. तसेच शॅकवाले व लहान लहान दुकानदारांकडूनही हप्ते घेण्याच्या प्रकरणात त्यांचा हात आहे. या संदर्भात आपल्याकडे अनेक तक्रारी आल्याने, ही सर्व बेकायदेशीर कामे आपण बंद केली. त्यामुळे त्यांनी आपल्यावर नाहक आरोप करण्याचे सत्र आरंभिले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या श्रमधाम योजने अंतर्गत गरीब विधवांना, अपंग लोकांना किंवा अगदी गरीब लोकांना अंत्योदय तत्त्वांवर घरे बांधून दिली जातात. पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या कामात सहभागी होतात. याच योजने अंतर्गत आपण कोणकोण व परिसरात 20 घरे बांधण्याचे काम सुरु केले आहे. हे जे लाकूड आपण बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्याच्या नावावर घेतले, ते याच घरांसाठी असे स्पष्टीकरण तवडकर यांनी दिले.

व्यवस्थित चौकशी न करता, खरोखरच पाच ट्रक लाकूड होते का? याची शहानिशा न करता, लाकूड नेमके कोणत्या प्रकारचे, हे न पहाता, सभापतिपदावर असलेल्या व्यक्तीला विरप्पन संबोधणे, लोकांची दिशाभूल करणे, ही कारणे पुढे करून आपण जनार्दन भंडारी व विकास भगत यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला भरणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी जाहीर केले.

येत्या एक दोन दिवसाच वकिलाशी बोलून हा खटला न्यायालयात दर्जा केला जाईल असेही तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT