Brahmeshanandacharya Swami Dainik Gomantak
गोवा

बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करा: सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

कळंगुट समुद्रकिनारी उपनयन संस्कार समारंभ

दैनिक गोमन्तक

कळंगुट: आपल्या घराचा समृद्ध वारसा ज्या पीढीकडे देऊ पाहतो त्या पिढीला संस्कारांनी मंडीत करणे हे पालकांचे दायित्व आहे. मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा आपल्या गृहस्थाश्रमी सुरू होण्याची आवश्यकता आहे. बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करता येते, असे पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आशीर्वचनातून मार्गदर्शन केले.

श्रीदत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी संचालित संत समाज सांगोल्डा यांच्या यजमान पदाखाली पद्मश्री धर्मभूषण पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात श्री देव बाबरेश्वर देवस्थान खोब्रावाडा कळंगुट समुद्र किनारी धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात सामूहिक उपनयन संस्कार समारंभ झाला.

यावेळी कळंगुट मतदार संघाचे आमदार मायकल लोबो, माजी सरपंच अविनाशी नाईक, पंच सदस्य दिनेश सीमेपुरुषकर, श्री रामचंद्र नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या संस्कार समारंभाचे पौरोहित्य स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुलच्या वैदिक विद्वानांकडून करण्यात आले.पूज्य स्वामीजींकडून उपनयन झालेल्या बटूंना उपदेश करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT