Monsoon 2024
Monsoon 2024 Dainik Gomantak
गोवा

लोकसभा निकालाच्या एक दिवस अगोदर गोव्यात वादळाचा इशारा!

Manish Jadhav

Southwest Monsoon: आनंदाची बातमी...! देशात मॉन्सून दाखल झाला आहे. केरळमधील कोट्टायम येथे मॉन्सूनचा पहिला पाऊस पडत आहे, त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. दरवर्षी केरळमध्ये मॉन्सून 1 जून रोजी दाखल होतो, परंतु 4 दिवसांपूर्वी आलेल्या रेमल चक्रीवादळामुळे मॉन्सून वेळे आधीच दाखल झाला.

आता मॉन्सून काही तासांत ईशान्य भारताकडे सरकणार असून, त्याचा परिणाम देशभरातील हवामानावर होणार आहे. प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 तासांत केरळमध्ये नैऋत्य मॉन्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील, असे हवामान विभागाने बुधवारी सांगितले होते. 15 मे रोजी हवामान विभागाने केरळमध्ये 31 मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. तर दुसरीकडे, गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांत येत्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, ईशान्येकडील राज्यांमध्ये (त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम) मॉन्सून दाखल होण्याची तारीख 5 जून आहे. त्याच काळात अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन, मालदीव, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, मध्य बंगालची खाडी, ईशान्य बंगालची खाडी आणि ईशान्य राज्यांच्या काही भागांमधून मॉन्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे. यानंतर येथे मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो.

तर गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 जून 2024 रोजी गोव्यात मोसमी पावसाची सुरुवात होऊन 30-40 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, मालदीव, केरळच्या किनाऱ्याजवळ आणि दक्षिण पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रावर 35 किमी प्रतितास ते 45 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 3 जून 2024 पर्यंत मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT