South Western Railway  Dainik Gomantak
गोवा

कॅसलरॉक-करंझोळ दरम्यान रेल्वे डबा घसरला

पाच तासांनंतर रेल्वे पूर्ववत; कोणतीही जीवितहानी नाही

दैनिक गोमन्तक

आज दक्षिण पश्चिम रेल्वे मालगाडीचा डबा कॅसलरॉक-करंझोळ दरम्यान घसरल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे सुमारे पाच तास ठप्प होती. रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने दुरुस्थी केली आहे. मात्र रेल्वे वाहतुक सेवा सुमारे पाच तास बंद राहीली. रात्री 8 च्या सुमारास रेल्वे सेवा दुरुस्थीचे काम संपल्याने ती पूर्ववत झाली. (South Western Railway inform Train coach derails between Castlerock-Caranzol section )

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी कॅसलरॉक-करंझोळ विभागादरम्यान येथे दुपारी 3.30 वाजता रेल्वे मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला होता अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामूळे या मार्गावरील रेल्वे सेवा जवळपास 5 तास ठप्प झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने रात्री 8 वाजता हा मार्ग मोकळा करण्यात आला.

याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रात्री 8.30 वाजता रेल्वे सेवा सामान्यपणे कार्यरत झाली आहे. या दरम्यान प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. तसेच कोणत्या ही प्रकारती जीवितहानी झालेली नाही असे दक्षिण पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. की, गाडी क्रमांक 2779- वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही कुडचडे-सावर्डे रेल्वे स्थानकावर नियमित होती ती रात्री 8.20 वाजता निघाली.

Goa Panchayat Election: काणकोणात प्रचार शिगेला

आगोंद: काणकोण तालुक्यातील सात पंचायतींच्या निवडणुकीसाठी आज रविवारी सर्व प्रभागांतील उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडविला. मतदारांच्‍या घरी जाऊन त्‍यांच्‍या गाठीभेटी घेण्‍याबरोबरच आपल्‍यालाच मतदान करा, असे सांगायला ते विसरले नाहीत.

तालुक्यातील सात पंचायतींच्‍या 56 प्रभागांतून 172 उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. 3 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. राज्‍यात भाजपची सत्ता असल्‍याने या पक्षाने समर्थन दिलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. पैंगीण, गावडोंगरी व श्रीस्थळ येथून प्रत्येकी 1 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT