Goa SIR Review Dainik Gomantak
गोवा

Goa SIR Process: वगळल्या जाणाऱ्या मतदारांचे भवितव्य काय? निरीक्षकांवर प्रश्नांची सरबत्ती; शेकडो गोमंतकीयांची नावे वगळण्याची भीती

Goa Voter List: मतदार यादी २१ फेब्रुवारीला जाहीर होईल पण वगळल्या जाणाऱ्या मतदारांचे भवितव्य काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की त्यांची नावे जोड मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: निवडणूक आयोगाने दक्षिण गोवा साठी नियुक्त केलेले मतदार यादी निरीक्षक संदीप जॅकीस यांनी गुरुवारी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन कचेरीतील सभागृहात बोलावलेल्या बैठकीत त्यांना मतदार यादीसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.

त्यातील एक महत्वाचा म्हणजे मतदार यादी २१ फेब्रुवारीला जाहीर होईल पण वगळल्या जाणाऱ्या मतदारांचे भवितव्य काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की त्यांची नावे जोड मतदार यादीत समाविष्ट केली जातील. पण जर ही जोड यादीचा विचार न करण्याचा निर्णय झाला तर काय? त्यावर त्यांनी सांगितले की, यावर आपण काही ठोस सांगू शकत नाही. हा निर्णय निवडणूक आयोग घेईल.

शेकडो नावे वगळल्याची भीती

गुरुवारच्या बैठकीत संदीप जॅकीस यांनी दक्षिण गोव्यातील एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेतला. ही त्यांची तिसरी भेट होती, या बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी, ईआरओ, साहाय्यक एईआरवो, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी सुधारीत मतदार यादी वापरली जाईल की नाही, यावर सुद्धा निवडणूक आयोग काय तो निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

शेकडो गोमंतकीयांची नावे मतदार यादीतून वगळण्याची भीती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. एसआयआर प्रक्रियेनंतर सुद्धा वगळल्यांची नावे त्यांनी योग्य कागदपत्रे सादर केल्यावर मतदार यादीत समाविष्ट केली जातील हे संदीप जॅकीस यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT