Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

South Goa taxi issue: दक्षिण गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालकांनी बेकायदेशीर ऑनलाईन टॅक्सी सेवा आणि त्यांच्याकडून स्थानिक चालकांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दक्षिण गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालकांनी बेकायदेशीर ऑनलाईन टॅक्सी सेवा आणि त्यांच्याकडून स्थानिक चालकांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी दक्षिण गोवा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष सावियो यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मडगाव येथील पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली. या शिष्टमंडळाने मडगावचे पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्याशीही चर्चा केली.

स्थानिक टॅक्सीचालकांना विनाकारण लक्ष्य केले जात असून त्यांच्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचा दावा या टॅक्सी प्रतिनिधींनी केला. पोलिसांनी ऑनलाईन टॅक्सीचालकांना त्यांची कागदपत्रे आणि कामकाजाचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, अनेक दिवस उलटूनही त्याचे पालन करण्यात आलेले नाही, असे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. स्थानिक टॅक्सीचालक हे सरकारी नियमावलीचे पालन करून आणि हॉटेल व्यावसायिकांशी समन्वय राखून सुरक्षित सेवा देत आहेत, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

ऑनलाईन टॅक्सीचालक हॉटेल आणि किनारी भागात तासन्‌तास आणि रात्रभर गाड्या उभ्या करून ठेवतात, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे, असा आरोपही करण्यात आला. या व्यतिरिक्त, ऑनलाईन चालक जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून एकतर्फी माहिती पसरवतात, ज्यामुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे, असेही या शिष्टमंडळाने पोलिसांना सांगितले.

कारवाईचे आश्वासन

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी टॅक्सीचालकांनी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या असून, प्राप्त माहितीच्या आधारे लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT