Corona  Dainik Gomantak
गोवा

Goa: कोरोनानंतर अनेकांचा आकस्मिक मृत्यू

चिंताजनक बाब : दक्षिण गोव्यात पन्नाशीतील 73 जणांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: धडधाकट दिसणारी पन्नाशी खालील व्यक्ती चालता चालता कोसळते आणि काही क्षणातच ती मृत पावते. कोविडच्या प्रादुर्भावानंतर राज्यात अशा मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून एका दक्षिण गोवा इस्पितळातच अशा 73 मृत्यूंची नोंद झाली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख शवचिकित्सक डॉ. मधू घोडकिरीकर यांनी ही माहिती दिली.

कोविडनंतर फक्त गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात अशा मृत्यूंचे प्रमाण वाढले असून ही एक चिंता करण्याची बाब आहे. ही संख्या फक्त जिल्हा इस्पितळात ज्यांची शवचिकित्सा केली त्यांचीच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अशा मृतांची संख्या बरीच अधिक असण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही.

दक्षिण जिल्हा इस्पितळाचा शवचिकित्सा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन काल एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त डॉ. घोडकिरीकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या सर्व व्यक्ती 50 च्या आतील होत्या.

त्यातील काहीजण तर ऐन 35 शीतील होते. सहा व्यक्ती तर अशा होत्या की त्यांना विमानतळावर आकस्मिक मृत्यू आला. त्यातील चारजण विमान प्रवास करून आले होते, तर दोघांना विमानात प्रवेश करताना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना आकस्मिक मृत्यू आला.

डॉ. घोडकिरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षभरात या शवागारात 57वाहन अपघाती मृत्यू आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दक्षिण गोव्यात प्रत्येक तिसऱ्या दिवसाला एक व्यक्ती अपघातात किंवा आत्महत्या करून मृत्यू पावली आहे. ही संख्याही कोविडनंतरच वाढली आहे.

मागच्या वर्षभरात या शवागारात एकूण 559 मृतदेहांची चिकित्सा केली. वरची आकडेवारी शिवाय अन्य मृत्यूमध्ये 35 प्रकरणे रेल्वे अपघातांशी, 24 बुडून मृत्यू, आठ कोविड मृत, तर प्रत्येकी 2 मृत्यू विजेच्या धक्क्याने, विषबाधा, गळा आवळून, श्वास कोंडून झाले, तर प्रत्येकी एक मृत्यू विषारी साप चावून आणि भाजल्याने झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

‘मृत्यूमागे लसीचा संबंध नाही’

पन्नाशीखालील व्यक्तींचा अशा आकस्मिक मृत्यूमागे कोविड लसीचा काही संबंध आहे का असे दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख शवचिकित्सक डॉ. मधू घोडकिरीकर यांना विचारले असता त्यांनी हे मृत्यू आणि लस यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. एक तर तणावामुळे किंवा प्रतिकार शक्ती क्षीण झाल्याने हे मृत्यू होत असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

कोविडनंतर राज्यात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकारही वाढले असून मागच्या एका वर्षात दक्षिण गोवा इस्पितळात अशाप्रकारे मृत्यू आलेल्या 93 मृतांची वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती डॉ. मधू घोडकिरीकर यांनी दिली. अशा मृत्यूंचे हे प्रमाण संपूर्ण राज्यात एक तृतीयांश असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT