Goa Court Judgement Dainik Gomantak
गोवा

Judicial Cases: नियुक्ती गोव्यात, काम कोल्‍हापूरात! दक्षिण सत्र न्‍यायालयातील स्‍थिती ‘दुष्‍काळात तेरावा’ अशी; तुंबले 17 हजार खटले

South Goa Sessions Court: दक्षिण गोवा जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या कक्षेखाली सासष्‍टी, मुरगाव, काणकोण, केपे आणि सांगे अशा पाच तालुक्‍यांच्‍या समावेश होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दक्षिण गोवा जिल्‍हा सत्र न्‍यायालयात दाव्‍यांचा खोळंबा वाढला असतानाच दक्षिण गोवा सत्र न्‍यायाधीश म्‍हणून नियुक्‍त शबनम शेख यांच्‍याकडे कोल्‍हापूर सत्र न्‍यायालयाचा ताबा दिल्‍याने सत्र न्‍यायालयातील स्‍थिती ‘दुष्‍काळात तेरावा’ अशी झालीय. न्‍या. शेख यांची नियुक्ती मडगावला तरी काम करावे लागते ते काेल्‍हापुरात.

दक्षिण गोवा जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या कक्षेखाली सासष्‍टी, मुरगाव, काणकोण, केपे आणि सांगे अशा पाच तालुक्‍यांच्‍या समावेश होतो. त्‍यामुळे या न्‍यायालयात दाव्‍यांची संख्‍या नेहमीच जास्‍त असते. वास्‍तविक दक्षिण गोवा जिल्‍हा व सत्र न्‍यायालयासाठी ६ न्यायाधीशांची नियुक्‍ती झाली आहे. मात्र, प्रत्‍यक्षात तीन न्‍यायाधीश कामकाज हाताळत होते.

त्यातच गतवर्षी नोव्‍हेंबर मध्ये दक्षिण गोव्‍यात अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश म्‍हणून काम करणाऱ्या डॉ. पूजा कवळेकर यांची पणजीच्‍या बाल न्‍यायालयात बदली झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या जागी न्‍या. शबनम शेख यांची बदली झाली होती.

मात्र, ४ डिसेंबर राेजी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या एका खास आदेशान्‍वये न्‍या. शेख यांची कोल्‍हापूर सत्र न्‍यायालयात ‘ऑफिसर ऑन स्‍पेशल ड्यूटी’ अशी नियुक्‍ती केल्‍याने त्‍या कोल्‍हापुरातच काम हाताळतात. त्‍यामुळे सध्‍या मडगावच्‍या सत्र न्‍यायालयात एक प्रधान सत्र न्‍यायाधीश आणि एक अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश असे दाेन न्‍यायाधीशच काम करतात.

मडगावात जिल्‍हा पातळीवर एकूण सहा न्‍यायाधीश तर प्रथम वर्ग न्‍यायालयात कनिष्‍ठ स्‍तरावर चार व वरिष्‍ठ स्‍तरावर चार असे एकूण आठ न्यायाधीशांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. मात्र, प्रत्‍यक्षात जिल्‍हा पातळीवर चार न्‍यायाधीशांची, कनिष्‍ठ पातळीवर एका न्‍यायाधीशाची तर वरिष्‍ठ पातळीवर तब्‍बल तीन न्यायाधीशांची अशी आठ पदे रिक्‍त असल्‍याने न्‍यायव्‍यवस्‍था कोलमडण्‍याच्‍या स्‍थितीत आली आहे.

...तर स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती

यासंदर्भात दक्षिण गोवा वकील संघटनेचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश यांचे लक्ष वेधले असून या दोन्‍ही न्‍यायालयाकडून तुमच्‍या मागण्‍यावर गंभीरतेने विचार केला जात आहे, असे उत्तर आले आहे. दक्षिण गोव्‍यात सध्‍या न्‍यायाधीशांची कमतरता भासत असल्‍यामुळे खटलेही तुंबले आहेत.प्रलंबित दाव्‍यांची संख्‍या १७ हजारांहून जास्त असून जर न्‍यायाधीशांच्‍या नियुक्‍त्‍या वेळेवर न झाल्‍यास ही स्‍थिती हाताबाहेर जाऊ शकेल, अशी चिंता वकील वर्तुळातून व्‍यक्‍त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transcend Goa 2026: ट्रान्सेंड गोवा- 26 चा बिगुल! कथानिर्मात्यांसाठी संधीचे द्वार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

'RSS'वरून रणकंदन! "स्वातंत्र्यलढ्यात योगदान कुठे? पुराव्यासह चर्चेला या" आप प्रदेशाध्यक्षांचे दामू नाईकांना खुले आव्हान

Kushavati District: नवीन जिल्हा मुख्यालयासाठी केपे सज्ज, कुशावती योग्य नाव; केपेवासीयांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Pilgao Protest: खाण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची वज्रमूठ! पिळगावात खनिज वाहतूक ठप्पच; प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT