Goa Crime News |Goa News Dainik Gomantak
गोवा

Crime in Goa : दक्षिण गोव्यात गेल्या वर्षभरात तब्बल 235 चोरीच्या घटना

दक्षिण गोव्यातील नवीन व्यवसायिक केंद्र म्हणून पुढे येणाऱ्या फोंड्यात सर्वाधिक चोऱ्या

सुशांत कुंकळयेकर

दक्षिण गोव्यातील नवीन व्यवसायिक केंद्र म्हणून पुढे आलेल्या फोंडा परीसरात आर्थिक उलाढाली वाढण्या बरोबर चोऱ्यांचेही प्रमाण वाढू लागले आहे. मागच्या वर्षभरात या पोलीस स्थानकाच्या हद्दीत तब्बल 43 चोऱ्यांची नोंद झाली असून दक्षिण गोव्यातील एकूण चोऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 18 टक्के आहे.

दुसऱ्या क्रमांकावर औद्योगीक क्षेत्र म्हणून मान्यता मिळविलेल्या वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत 36 चोऱ्या झाल्या असून एकूण चोऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 15 टक्के आहे. तर तिसरा क्रमांक मडगावचे विकसित होणारे उपनगर असलेल्या फातोर्डा पोलीस स्थानकाचा लागत असून मागच्या वर्षभरात या पोलीस स्थानकाच्या हद्दीत 22 चोऱ्यांची नोंद झाली असून हे 9 टक्के आहे. या तिन्ही पोलीस स्थानकावरील चोऱ्यांची एकूण टक्केवारी 42 टक्के एव्हढी होत आहे.

दक्षिण गोव्यात एकूण 16 पोलीस स्थानके समाविष्ट असून सरत्या 2022 या वर्षात या सर्व पोलीस स्थानकांच्या हद्दीत 135 चोऱ्यांची नोंद झाली आहे. त्यातील 159 चोऱ्यांच्या तपास लावणे पोलिसांना शक्य झाले असून त्यांच्या तपासाची टक्केवारी 67 एवढी आहे. यात दिवसा झालेल्या घरफोड्या 11 असून त्यातील 10 चोऱ्यांच्या तपास लागला.

रात्रीच्या घरफोड्या 33 असून त्यापैकी 21 चोऱ्यांचा तपास लावणे शक्य झाले आहे. रात्रीच्या 24 चोऱ्यापैकी 16, अन्य 60 चोऱ्यापैकी 31, सोनसाखळ्या मारण्याचे 9 प्रकार घडले असून त्यातील फक्त 2 चोऱ्यांचाच तपासलागला आहे. तर अन्य भुरट्या चोऱ्यांचे 98 प्रकार घडले असून त्यातील 97 चोऱ्यांच्या तपास लागला आहे.

फोंडा आणि वेर्णा भागात औद्योगिक वसाहती उभ्या झाल्याने परप्रांतीय कामगारांची वाढ झाली आहे. तर फातोर्डा परिसरात हे कामगार राहात आहेत. त्यामुळेच येथे जास्त चोऱ्या झालेल्या दिसत आहेत. या भागात लोकवस्ती जास्त असली तरी घरे विरळ असल्याने याच भागांवर चोरट्यांनी जास्त लक्ष्य केले असल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदवलं आहे.

फोंड्यातील चोऱ्यात आणखी एक लक्षणीय बाब पुढे आली आहे आणि ती म्हणजे मागच्या वर्षी या भागात तब्बल सहावेळा दिवसा घरफोड्या झाल्या आहेत. त्यामानाने पूर्वी ज्या भागात चोऱ्यांचे प्रमाण जास्त त्या मडगाव आणि वास्को पोलीस स्थानकाच्या हद्दीत जास्त चोऱ्या व्हायच्या तिथे मागच्या वर्षी प्रत्येकी 16 चोऱ्यांची नोंद झालेली असून हे प्रमाण तुलनेने बरेच कमी आहे. या दोन्ही शहरात लोकांची घरे दाटीवाटीने असल्याने चोरटे तिथे फारसे जात नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मायणा - कुडतरी (19), केपे आणि कुडचडे (14) येथे चोऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दक्षिण गोव्यात सहा पोलिस स्थानकात सर्वात कमी चोऱ्यांची नोंद झाली असून त्यात विमानतळ (3), वास्को रेल्वे, सांगे , कुळे व मुरगाव (प्रत्येकी 6) व काणकोण (7) या पोलीस स्थानकांचा त्यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT