Goa Railway Dainik Gomantak
गोवा

South Goa Railway : दुपदरी रेल्वे मार्गाची आज गती चाचणी; नोटीस जारी

South Goa Railway : माजोर्डा-कासावली मार्गावर प्रवेशबंदी

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa Railway :

सासष्टी, दक्षिण गोव्यातील रेल्वे मार्गावर दुपदरी करणाच्या कामाने गती घेतली असून जिथे हे काम पूर्ण झाले आहे त्या भागातील रेल्वे मार्गाची गती चाचणी १० जूनला करण्याचा निर्णय दक्षिण पश्र्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे.

सर्वप्रथम माजोर्डा-कासावली दरम्यानच्या मार्गाची चाचणी केली जाईल.

रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केवळ कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचा आरोप सरकार व रेल्वे प्रशासनावर करण्यात येत आहे. या चाचणीची नोटीस दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्ताने काढली आहे.

या चाचणीवेळी अडथळा आणणाऱ्यास किंवा रेल्वे मार्ग बळजबरीने ओलांडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. या चाचणीनंतर बेंगळुरू येथील रेल्वे सुरक्षा आयुक्ताने योग्यता मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग खुला केला जाईल, असे कळविण्यात आले आहे. माजोर्डा ते कासावली हे साडेचार किलो मीटर अंतर आहे. हे काम वास्को ते तिनईघाट दुपदरीकरण योजने अंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Premier League Auction: 'दर्शन' गोव्यातील महागडा क्रिकेटपटू! प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा लिलाव; 21 मार्चपासून रंगणार स्पर्धा

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराबाबत महत्वाची बातमी! T20 मध्ये घेणार मोठा ब्रेक; कारण आले समोर..

Tiger Reserve Goa: व्‍याघ्र प्रकल्‍पाबाबत होणाऱ्या सुनावण्‍यांवर 1 कोटीपेक्षा अधिक खर्च, वनमंत्री राणेंनी दिली माहिती

Cancer Patients In Goa: सावधान! गोव्यात वाढते आहे कॅन्सरचे प्रमाण; आरोग्यमंत्री राणेंनी केली आकडेवारी जाहीर

इंग्लंडच्या 'फेसबुक फ्रेंड'ने पाठवले बर्थडे गिफ्ट! बॉक्स उघडल्यावर लागला चुना; शिरोड्यातील व्यक्तीला 1.61 लाखाचा गंडा

SCROLL FOR NEXT