Police Superintendent Sunita Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: सुनीता सावंत आमदारांना सहकार्य करत नव्हत्या? दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची तडकाफडकी बदली का केली?

South Goa SP: सुनीता सावंत यांच्या अचानक झालेल्या या बदलीबाबत पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या बदलीचा काल रात्री उशिरा तडकाफडकी आदेश काढण्यात आला. या पदाचा अतिरिक्त ताबा अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे आयपीएस अधीक्षक टिकम सिंग यांच्याकडे देण्यात आला आहे.

अधीक्षक सावंत यांना पोलिस मुख्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या या बदलीबाबत पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अधीक्षक सुनीता सावंत या दक्षिण गोव्यातील काही आमदारांना सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आल्या होत्या.

दक्षिण गोव्यात घडलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी त्यांनी तपासकामात राजकारण्यांनी केलेली शिफारस फेटाळून लावली होती.

त्यामुळे काल सोमवारी रात्रीच सरकारकडून आदेश येण्यापूर्वीच आपण आपले कार्यालय सोडत असल्याचे पोलिस खात्याला त्यांनी कळविले व काही तासांनंतरच लगेच त्यांच्या बदलीचा आदेश आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT