Dhirio  Dainik Gomantak
गोवा

Dhirio In Goa : गोव्यात धीरयो कायदेशीर करा; खासदार सार्दिन यांची राज्य सरकारकडे मागणी

धीरयो गोव्याची परंपरा : खासदार सार्दिन

गोमन्तक डिजिटल टीम

राज्य सरकारने धीरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आज पत्रकार परीषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यातील जल्लीकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत व कर्नाटकातील बैलांची शर्यतीला मान्यता दिली आहे. हा वैध कायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारनेही कायदा करावा, असे ते म्हणाले.

धीरयो गोव्याची परंपरा आहे. पूर्वी फेस्तांमध्ये सुद्धा धीरयो लढती होत. पण काही प्राणी प्रेमींना हा प्रकार क्रुर वाटतो. २०१९ साली आपण या संदर्भात विधेयक मांडले होते.

मात्र, त्याला मान्यता मिळाली नाही. जनावरे सुद्धा आपसात भांडतातच. हा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल खेळताना सुद्धा किंवा दुचाकी शर्यतीच्या वेळी सुद्धा अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारांनाही बंदी का नाही? असा प्रश्न सार्दिन यांनी उपस्थित केला.

जे बैलांचे मालक असतात, त्यांना सुद्धा कोणाचा बैल वरचढ आहे हे पाहण्याची हौस असतेच की असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

Goa Assembly Session Live: स्थानिकांना डावलणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा... आमदार चंद्रकांत शेट्ये यांची मागणी

Karun Nair: लहान मुलासारखा रडला करुण नायर, केएल राहुलने दिला आधार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नेमकं काय झालं?

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT