Court Dainik Gomantak
गोवा

ओव्हरटेकच्या नादात मुलाचा दुर्दैवी मृत्यू; आईला मिळणार 36.84 लाख रुपये, न्यायाधिकरणाकडून नुकसानभरपाईचा आदेश

South Goa accident compensation: काणकोण तालुक्यातील शेळी-लोळये येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्हॅलेंटाईन बार्रेटो (३३) यांच्या आईला ३६,८४,७०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दक्षिण गोवा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: काणकोण तालुक्यातील शेळी-लोळये येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्हॅलेंटाईन बार्रेटो (३३) यांच्या आईला ३६,८४,७०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दक्षिण गोवा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे.

दक्षिण गोवा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्य राम प्रभूदेसाई यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. नुकसानभरपाईची रक्कम अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून ६.८० टक्के वार्षिक व्याजासह देण्याचा आदेश न्यायाधिकरणाने प्रतिवादींना दिला आहे. अँथनी फर्नांडिस (२२) हा पोळे येथील युवक दुचाकीवरून जात होता.

व्हॅलेंटाईन बार्रेटो हा त्याच्या दुचाकीवर मागे बसला होता. समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अँथनीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याशेजारील दगडावर आदळून दोघेही बाजूच्या झाडीत पडले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने व्हॅलेंटाईन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तपास अधिकारी हवालदार दीपक गावकर यांनी दिलेल्या साक्षीनुसार, दुचाकी चालकाचा निष्काळजीपणा आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणे हे अपघातास कारणीभूत ठरले.

संयुक्तपणे ही रक्कम भरा

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, मोटार अपघात दाव्यांमध्ये फौजदारी खटल्याप्रमाणे पुरावे सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. मयत व्हॅलेंटाईन हे काणकोण येथील नॉर्बर्ट फिटनेस स्टुडिओमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून दरमहा २५ हजार रुपये वेतनावर कार्यरत होते. न्यायाधिकरणाने त्यांच्या मासिक उत्पन्नाचा विचार करून एकूण ३६,८४,७०० रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT