Begging at traffic signals in Goa Canva
गोवा

South Goa: गोव्यात 'भिकाऱ्यांच्या' उपद्रवाने पर्यटक हैराण! मुंबई, बंगळुरूसह परप्रांतीयांचा भरणा; दलाल घेतात गैरफायदा

South Goa beggars: मुंबई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरातूनही भीक मागण्यासाठी गोव्यात येतात, त्यांची साखळी असते, दलाल त्यांना भीक मागण्यास लावतात.

Sameer Panditrao

मडगाव: दक्षिण गोव्यात भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला असून, मागच्या वर्षी पोलिसांनी या जिल्ह्यात एकूण २०१ भिकाऱ्यांवर कारवाई केली. भिकारी ही एक आता सामाजिक समस्या बनत चालली आहे. पोलिस कायद्याप्रमाणे कारवाई करतात, मात्र या भिकाऱ्यांवर आळा घालण्यात मात्र ते यशस्वी होत नाही.

ट्राफिक सिग्नलवर भीक मागितली जाते. तसेच रस्त्यावर व समुद्र किनारीही भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटकही हैराण होत आहेत.

मडगाव हे दक्षिण गोव्याचे प्रमुख शहर आहे. साहजिकच येथे भिकाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मागच्या वर्षी पोलिसांनी याच शहरात ११० जणांना भीक मागताना पकडून, त्यांच्यावर कारवाई केली. वास्कोचा त्यानंतर नंबर लागत आहे. गेल्या वर्षी येथे पोलिसानी ६२ जणांवर कारवाई केली. फातोर्ड्यात १४, वेर्णा १३ व मायणा-कुडतरीत दोघांवर कारवाई केली.

भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र अनेकांसाठी उपजीविकेचा तो एक भाग बनला आहे. भीक मागणारे हे प्रामुख्याने परप्रांतीय असतात. मुंबई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरातूनही भीक मागण्यासाठी गोव्यात येतात, त्यांची साखळी असते, दलाल त्यांना भीक मागण्यास लावतात आणि त्यांच्या मिळकतीचा मोठा हिस्सा आपल्याकडे ठेवतात, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

कळंगुटात कारवाई

नुकतेच कळंगुट पोलिसांनी किनाऱ्यांवर फिरणाऱ्या २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. यामध्ये पाच दलाल तसेच सार्वजनिकस्थळी त्रास निर्माण करणारे अकरा जण तर आठ भिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT