Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Result : दक्षिणेतील वाढीव टक्का कोणाला? उत्सुकता शिगेला

Goa Loksabha Election Result : दुपारी १२ वाजेपर्यंत होणार चित्र स्पष्ट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result :

मडगाव, दक्षिण गोव्‍यातून यावेळी सहा उमेदवार रिंगणात उभे आहेत. मात्र, प्रत्‍यक्षात ही लढत होणार ती भाजपच्‍या पल्‍लवी धेंपे आणि काँग्रेसचे कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांच्‍यामध्‍येच. यावेळी दक्षिण गोव्‍यातून ४,४५,९१६ मतदारांनी मतदान केले असून ७४ टक्‍क्‍यांवर गेलेले हे मतदान कुणाच्‍या बाजूने झुकणार याबद्दल उत्‍सुकता असून उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत हे चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

‘एक्झिट पोल’च्या संकेतानुसार दक्षिण गोव्‍यात काही प्रमाणात काँग्रेसला झुकते माप देण्‍यात आलेले असले, तरी यावेळी दक्षिण गोवा आम्‍हीच जिंकणार असा दावा भाजपच्‍या नेत्‍यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्‍ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी दक्षिण गोव्‍यातून भाजपच्‍या पल्‍लवी धेंपे किमान २५ हजारांच्‍या आघाडीने जिंकून येतील, असा विश्वास व्‍यक्‍त केला.

दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी दक्षिण गोव्‍यात काँग्रेसचा विजय निश्चित असा दावा करताना, भाजपच्‍या बजबजपुरीला मतदार कंटाळले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला मतदान केले आहे असा दावा त्‍यांनी केला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि आपचे व्हेंझी व्‍हिएगस यांनीही दक्षिण गोव्‍यातून इंडिया आघाडीचा उमेदवार सहजपणे जिंकून येईल, असा विश्वास व्‍यक्‍त केला.

युगोडेपाचे उपाध्‍यक्ष आणि राजकीय विश्लेषक ॲड. राधाराव ग्रासियस यांनी आज ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात प्रचाराच्‍या दरम्‍यान लोकांकडून जो प्रतिसाद मिळत होता तो पाहिल्‍यास दक्षिण गोव्‍यातून काँग्रेस उमेदवार सहजपणे जिंकून येईल असे वाटते. मात्र, यावेळी भाजपकडून पैशांचा सढळहस्‍ते जो वापर केला गेला तसा यापूर्वी कुठल्‍याही लोकसभा निवडणुकीत केला गेला नव्‍हता. मतदारांनी या पैशांच्‍या आमिषाला बळी पडून जर मतदान केले, तरच भाजपाच्‍या उमेदवार जिंकून येऊ शकतात. अन्‍यथा काँग्रेसच दक्षिण गोव्‍यातून जिंकून येईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT