Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

शाई लावलेले बोट दाखवा अन् गोव्याच्या रेस्टॉरेंटमध्ये सवलत मिळवा

विधानसभा निवडणूकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दक्षिण गोवा यांनी याच अनुषंगाने एक उपक्रम राबविला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभांच्या (Goa Assembly Election 2022) 40 जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत मतदारांद्वारे चांगला प्रतिसाद लाभावा यासाठी निवडणूक कार्यालयाद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम करण्यास सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणूकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दक्षिण गोवा यांनी याच अनुषंगाने एक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत केवळ शाई लावलेले बोट दाखवून रेस्टॉरेंटमध्ये सवलत मिळणार आहे. (Do Vote and get discount at goa restaurant)

ही सवलत प्राप्त करण्यासाठी http:s//csssg.goa.gov.in/pledge या पोर्टलवर मतदार आपली प्रतिज्ञा मराठी,कोंकणी किंवा इंग्रजी भाषेतून नोंदवू शकतात. त्याचसोबत, या पोर्टलवर दक्षिण गोवा जिल्ह्यातील निवडणूकीच्या दिवशी 73 रेस्टोरंटद्वारे देण्यात आलेली सवलत देखील पाहायला मिळेल. मतदारांनी मतदान (Voting) केले आहे याचा पुरावा म्हणून केवळ शाही लावले बोट दाखवावे लागेल. सवलत उपलब्ध असलेल्या प्रत्येक रेस्टोरंटला बेव पोर्टलच्या क्युआर कोड सहित पोस्टर देखील प्रदर्शित करण्यासाठी दिले आहे. दक्षिण गोव्यातील (South Goa) सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी क्युआर कोड स्कॅन करावा अथवा वेब पोर्टलवर जाऊन आपली प्रतिज्ञा नोंद करावी आणि मतदान करावे.

पार्टलची लिंक दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. 73 रेस्टोरंटची यादी http:s//csssg.goa.gov.in/pledge देखील पोर्टलवर उपलब्ध आहे. या रेस्टोरंटमध्ये कॅफे चाय कॉफी, नवतारा व्हेज रेस्टॉरंट, कृष्णा व्हेज मल्टी कुझिन रेस्टॉरंट, शारदा रेस्टॉरंट ( Restaurant), वाह मोमो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, पेस्ट्री पॅलस, द रसोडा, द फिशरमन्स वॉर्फ, रेड जिंजर, कोलवा, देसी कुपा, बिग मिश्रा पेढा, डॉमिनोज पिज्झा, केंटुकी रेस्टोरंट, बेक्ड फ्यूजन, यांसारख्या प्रसिध्द रेस्टॉरंटचा समावेश आहे. या पोर्लटवर अनेक मतदारांनी भेट दिली आहे. मतदान दिनी पोर्टलवर दिल्या प्रमाणे मतदारांना सवलती प्रदान केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT