Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

South Goa : मुख्यमंत्र्यांच्या ट्रस्टवर विश्वास नाही! युरी आलेमाव

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्ट बनवण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रस्तावावर गोमतकीयांचा ‘ट्रस्ट’ अर्थात विश्वास नाही.

या ट्रस्टमध्ये अदानी, अंबानी, जीएमआर आणि इतर क्रोनी कॅपिटॅलिस्ट विश्वस्त म्हणून असू शकतात. भाजप सरकारने आयसीयू, कॅथलॅब, न्युरोसर्जरी युनिटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञांसह सर्व मंजूर कर्मचारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्वरित नियुक्त करावेत. आम्ही खासगीकरणाला विरोध करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी सर्व काही क्रोनी कॅपिटॅलिस्टच्या हाती सोपवण्याचे धोरण अवलंबिल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हा गोमंतकीयांना स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेस सरकारचा दूरदर्शी प्रकल्प होता. रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावाविरुद्ध आम्ही एकत्रितपणे लढा देऊ आणि विरोध करू, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

सरकारने अजून आवश्यक असलेली कार्डियाक कॅथलॅब सुरू केलेली नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्डिओलॉजिस्ट आठवड्यातून एकदाच मडगावला येऊन कार्डिओलॉजी ओपीडी सेवा देत आहे. न्यूरो सर्जरी युनिट कधी सुरू होईल, हे कोणालाच माहीत नाही. सरकार वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देत आहे.

त्यांच्याकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, परंतु आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता आहे. नेफ्रोलॉजी, न्युरोलॉजी, कार्डिओलॉजी, आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट), आयटीयू (इंटेन्सिव्ह ट्रॉमा युनिट), सीसीयू (क्रिटिकल केअर युनिट), प्लास्टिक सर्जरी आणि एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग), ऑन्कोलॉजी यासारख्या सुपर स्पेशालिटी सेवा अजूनही दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत, असे युरी आलेमाव म्हणाले.

जिल्हा इस्पितळात डॉक्टरांची २८ रिक्त पदे

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डॉक्टरांची २८ रिक्त पदे भरायची आहेत. या रिक्त पदांमध्ये १ वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, २ वरिष्ठ शल्यचिकित्सक, १ वरिष्ठ ईएनटी सर्जन, एक वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक,

एक वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, २ वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, २ मेडिको कायदेशीर अधिकारी, ३ कनिष्ठ भूलतज्ज्ञ आणि ३ वैद्यकीय अधिकारी आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

अनेक रुग्णांना पाठविले जाते गोमेकॉत

माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे, ६४२ मंजूर पदांपैकी ४९४ पदे भरलेली आहेत, त्यापैकी १५९ कंत्राटी पद्धतीवर आहेत आणि १५५ पदे अजूनही रिक्त आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे कुचकामी ठरले आहे. जवळजवळ प्रत्येक रुग्णाला गोमेकॉत किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT