South Goa District Hospital Dainik Gomantak
गोवा

Margao District Hospital: जिल्हा इस्पितळात वाढती गर्दी! प्रशासनाचा जादा सुरक्षा रक्षकांसाठी प्रस्ताव

South Goa News: जिल्हा इस्पितळातली गर्दी नियंत्रणात आणणे कठीण होत असते. परिणामी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तक्रारी करू लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून इस्पितळ प्रशासनाने आरोग्य खात्याकडे जादा सुरक्षा रक्षकांसाठीचा प्रस्ताव पुढे केल्याचे कळते.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa District Hospital Margao Additional Security Guards

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दररोज शेकडो रुग्ण येत असतात. ओपीडी व नोंदणीसाठीच्या विभागात रुग्णांचा व त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक, मित्र मंडळीची संख्या जास्त असते. त्यामुळे इस्पितळात तोबा गर्दी होते, त्यामुळे ती गर्दी नियंत्रणात आणणे कठीण होत असते. परिणामी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तक्रारी करू लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून इस्पितळ प्रशासनाने आरोग्य खात्याकडे जादा सुरक्षा रक्षकांसाठीचा प्रस्ताव पुढे केल्याचे कळते.

दर दिवशी कमीत कमी वेगवेगळ्या उपचारासाठी नोंदणीसाठी १५०० रुग्णांची गर्दी इस्पितळाच्या तळमजल्यावरील प्रवेशद्वारात होत असते. रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी जास्तच गर्दी झालेली दिसते. त्यामुळे इस्पितळात गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभाव जाणवतो.

इस्पितळाचे वैद्यकीय निरीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी आरोग्य खात्याकडे ज्यादा सुरक्षा रक्षकांची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच नोंदणी काउंटरवरही माहिती व तंत्रज्ञान खात्याकडून जादा कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आल्याचे कळते.

जागा काही वाढवता येत नाहीत, पण गर्दी व्यवस्थापनासाठी जादा सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करणे शक्य असल्याचे डॉ. बोरकर यांचे म्हणणे आहे. सध्या आम्हाला रुग्णांना रांगेत ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही डॉ. बोरकर सांगतात.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राणे यांनी इस्पितळाला आकस्मिक भेट देऊन समस्या सोडवण्याचे त्यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT