Illegal Boards Dainik Gomantak
गोवा

South Goa: बेकायदेशीर जाहिरात फलक तीन महिन्यांत काढून टाका

Illegal Boards: दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश

दैनिक गोमन्तक

South Goa: सार्वजनिक ठिकाणी एकदा का जाहिरात किंवा प्रसिद्धीफलक लावले की नंतर ते काढण्याची तसदी घेतली जात नाही. अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे हे फलक तसेच असतात. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत असे बेकायदेशीर फलक काढण्यासाठी स्थानिक सरकारी संस्थांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने यासंबंधी गंभीर दखल घेतली आहे. या फलकांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच ते अपघातांसाठी कारण बनू शकतात.

मुंबई उच्च न्यायालयाने हल्लीच यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग मंडळाला बेकायदेशीर जाहिरात फलकांबद्दल धारेवर धरले होते. स्थानिक सरकारी संस्था सदर फलक काढत नाहीत म्हणून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्‍यानुसार उच्च न्यायालयाने 17 नोव्हेंबर 2022 रोजी मुदत दिली होती. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही.

दरम्‍यान, उप;जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांनी अलीकडेच अशा बेकायदेशीर जाहिरात फलकांचे सर्व्हेक्षण करून अहवाल सादर केला होता. स्थानिक सरकारी संस्थांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक लावण्यास परवानगी देऊ नये व त्याचबरोबर या फलकांचे नियतित सर्व्हेक्षण करण्याचा आदेशही दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारताचा धमाका! नेमबाजांची एकाच दिवशी पदकांची बरसात; सुचिका तरियालने रचला नवा इतिहास

Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

Bicholim Lift Problem: शिवाजी महाराज संकुलातील दोन्ही 'लिफ्ट' वर्षभरापासून बंद; डिचोलीतील नागरिकांची गैरसोय, ज्येष्ठांची तर मोठी परवड

SCROLL FOR NEXT