Margao Dainik Gomantak
गोवा

Margao : 'होलसेल मासळी मार्केट सोपो कंत्राटाबाबत आता सरकारकडून घेणार सल्ला'

मडगाव येथील होलसेल मासळी मार्केट सोपो गोळा करण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करा, असा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊन बरेच महिने लोटले तरी ही एसजीपीडीए कडून ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील होलसेल मासळी मार्केट सोपो गोळा करण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करा, असा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊन बरेच महिने लोटले तरी ही एसजीपीडीए कडून ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ही निविदा जारी करताना काय अटी घालाव्या यासाठी प्राधिकरण सरकारकडे सल्ला मागणार आहे.

(sopo tax in margao fish market)

आज झालेल्या एसजीपीडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी दिली. या संबंधीचा मसुदा प्राधिकरणाच्या सदस्यांना आधी देण्यात येणार असून त्यानंतर तो मान्यतेसाठी सरकारला पाठवून देण्यात येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.

आजच्या या बैठकीत रिटेल मासळी मार्केटात व्यापाऱ्यांना सुविधा देण्यावरही चर्चा झाली. या मार्केटतील मासळी विक्रेत्यांकडून थोडे ज्यादा शुल्क आकारून त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधी विक्रेत्यांकडे त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उसगाव येथील मार्केटची दुरुस्ती हातात घेण्याबाबत चर्चा झाली. हे काम पीपीपी तत्वांवर करावे की अन्य कोणत्या पद्धतीने या बद्दल सरकारचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे साळकर यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maja Flat Scheme Goa: 'माझा फ्लॅट' योजनेचा मोठा दिलासा! 'सेलडीड' नसलेल्या हजारो फ्लॅटधारकांना अखेर मिळणार कायदेशीर हक्क

Goa Transport Rules: रेंट-ए-कॅबमधील थार वाहनांवर निर्बंध लागू; 15 जुलैपासून एआय कॅमेऱ्यांद्वारे होणार स्वयंचलित चलन

Shukra Gochar 2026: लव्ह लाईफमधील गैरसमज संपणार अन् लग्नाची सनई वाजणार! 5 राशींना मिळणार राजासारखे वैभव; शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Goa Casino: मांडवी नदीत महाकाय कॅसिनो जहाज प्रवेशास स्थगिती कायम; सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत तहकूब

Heavy Rain in Goa: बाणावली येथे घरावर झाड कोसळून एक जखमी, सासष्टीत ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार; छपरासह साहित्याचे नुकसान

SCROLL FOR NEXT