Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: सत्तरीकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर; वाळपईत लवकरच क्रीडा संकुल बनणार

सत्तरीमध्ये लवकरच 33,000 चौरस मीटरचे नवीन क्रीडा संकुल तयार होणार आहे.

दैनिक गोमन्तक

सत्तरीमध्ये लवकरच 33,000 चौरस मीटरचे नवीन क्रीडा संकुल तयार होणार आहे. येथील मैदान अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने क्रीडाप्रेमींना त्याचा वापर करता येत नव्हता. मात्र आता लवकरच याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नगरविकास मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांनी सांगितल्याप्रमाणे, वाळपईतील लोकांसाठी या मैदानाचा विकास हे गेल्या 16 वर्षांपासून आपले ध्येय होते. नुकतेच, राणेंनी मैदानाची पायाभरणी केली होती.

ते पुढे म्हणाले की, क्रीडा सुविधेमध्ये सर्व आवश्यक सुविधा असतील. संकुल सर्व खेळांना सामावून घेईल, मुलांना त्यांच्या आकांक्षा आणि व्यवसायांचा आधार देण्याइतके सक्षम असेल."

सत्तरीमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्यानांचे सुशोभीकरण आणि अन्य बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, नगरविकास मंत्री या नात्याने, मला केवळ सत्तरीच्याच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपल्या लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रगत पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे.

पर्येच्या आमदार देविया राणे यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले हे क्रीडा संकुल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही क्रीडा लीगचे आयोजन करेल. हे आमच्या छोट्या शहर वाळपईचा जगभरात प्रचार करेल. व्यावसायिक खेळाकडे झुकणाऱ्या आमच्या तरुणांच्या आकांक्षाही पूर्ण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT