Sonali Phogat last dance Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat death: सोनाली फोगट यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

दोन्ही आरोपी सोनाली फोगट यांच्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळताना दिसत आहेत- गोवा पोलीस

दैनिक गोमन्तक

गेल्या तीन ते चार दिवस सोनाली फोगाटच्या हत्याप्रकरणावरुन गोव्यात वातावरण चांगलच तापलं आहे. सोनालीच्या मृत्यूवरुन तिच्या नातेवाईकांनी केलेले आरोप. राजकिय नेत्यांनी सुरु केलेले आरोप - प्रत्यारोप यामुळे या प्रकरणाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आणखी एक व्हिडिओ बाहेर आला आहे.

(Sonali Phogat's last dance video goes viral)

या व्हिडीओमध्ये फोगट यांचा सहकारी त्यांना डान्ससाठी घेऊन जात असल्याच्या एका व्हिडीओमध्ये फोगट यांचा चालताना तोल जात असल्याने त्यांना धरुन चालत आहे. तसेच पुढे या व्हिडीओत फोगट यांना घेऊन ते पुढे चालत जाताना दिसत आहे.

याबरोबर पुढच्या व्हिडीओमध्ये फोगट ह्या आपल्या सहकाऱ्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. ज्याच्यामध्ये मोठ्या आवाजात गाण्यांचा आवाज येत असून त्याच्या तालावर फोगट आणि त्यांचा सहकारी फेर धरताना दिसत आहेत.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, दोन्ही आरोपी सोनाली फोगटच्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळताना दिसत आहेत. अटकेतील आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग हे 22 ऑगस्ट रोजी फोगटसोबत गोव्याला आले होते.

आयजी बिश्नोई यांनी याबाबत सांगितले की, पोलिस चौकशीत आरोपींनी उत्तर गोव्यातील अंजुना रेस्टॉरंटमध्ये फोगटला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT