Sonali Phogat murder Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Murder Case: संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

गोवा पोलीसांनी कर्लीस क्लब केला सील

दैनिक गोमन्तक

सोनाली फोगट खून प्रकरणातील संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर पाल सिंग या दोन संशयित दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी न्यायलयाने आज सुनावली. या प्रकरणातील सर्व शक्यता पडताळून पाहात गुन्ह्यात सामावेश असलेल्या प्रत्येक आरोपीला जेरबंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं गोवा पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

(Sonali Phogat murder case suspects remanded to 10 days police custody)

या प्रकरणात मुख्य घडामोडी ज्या ठिकाणी घडल्या त्या कर्लीस क्लबला आता बंद करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी प्रसार माध्यमांना दिली. सोनाली फोगट हत्या प्रकरणात ड्रग्स प्याडलर दत्त प्रसाद आणि संबंधित कर्लीस बार मालकाला अटक झाली आहे. यामूळे राज्यातील सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.

दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

सोनाली फोगट हत्याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाणार असून या संपूर्ण प्रकरणात दोषी जे आढळतील, त्यांना 100 टक्के शिक्षा दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून पोलीस आपले कर्तव्य योग्यपणे बजावत नसल्याने गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री पूर्णतः अपयशी ठरल्याने गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT