Goa Crime News | Shiroda Murder Case News | Son accidently killed father at Shiroda  Dainik Gomantak
गोवा

Shiroda Murder Case: वडिलांच्या खुनप्रकरणी मुलगा 7 दिवस गजाआड

खून बुधवारी दुपारी झाला होता.

दैनिक गोमन्तक

फोंडा: तळपणवाडा-शिरोडा येथे मुलानेच वडिलांचा खून केल्याने या भागात खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणातील संशयित राजेश गावकर याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता सात दिवसांचा रिमांड देण्यात आला.

हा खुनाचा प्रकार बुधवारी दुपारी घडला होता. लग्नाच्या (Marriage) विषयावरून भांडण उकरून काढून राजेश याने वडील गणेश गावकर यांच्यावर लोखंडी पहार व टाईल्सचा तुकडा डोक्यावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अत्यवस्थ स्थितीत बांबोळी इस्पितळात दाखल केले असता तेथेच त्यांचे निधन झाले. त्यानंतर फोंडा पोलिसांनी (Police) संशयित राजेशविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता. उपलब्ध माहितीनुसार भांडण झाले त्यावेळेला राजेश दारुच्या नशेत होता. (Shiroda Murder Case News Updates)

संशयित राजेश गावकर हा रोजच वडिलांशी लग्नाच्या विषयावरून भांडत होता. राजेशची विवाहित बहीण जवळच राहत असल्याने तीच या दोघांना जेवणखाण करून देत होती. तिनेच फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून फोंडा (Phonda) पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT