Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

Goa CM Dr. Pramod Sawant: आम्ही कोकणीचा प्रचार करतो पण, त्याचवेळी हिंदीचे महत्व देखील आपण समजून घेतले पाहिजे, असे सावंत म्हणाले.

Pramod Yadav

Goa CM Dr. Pramod Sawant

पणजी: दक्षिण भारतातील काही राज्य आणि राजकीय पक्ष हिंदी बोलण्याचा किंवा समजून घेण्याचा देखील प्रयत्न करत नाहीत. प्रादेशिक भाषांसोबत हिंदीचा प्रसार आणि प्रचार करण्याची गरज असल्याचे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात मांडले.

गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. आजपण दक्षिणेतील काही राज्य राष्ट्रभाषा समजण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. काही लोक आणि राजकीय पक्ष जाणिवपूर्वक असे करतायेत, असा आरोप मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

प्रादेशिक भाषांचा प्रसार केला जावा असे आपण म्हणतो आणि तो केलाच पाहिजे त्यात शंका नाही. पण देशभरात संवादासाठी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांना जोडणारी एक भाषा असावी. प्रत्येकाला हिंदी भाषेचे किमान ज्ञान असावे. आम्ही कोकणीचा प्रचार करतो पण, त्याचवेळी हिंदीचे महत्व देखील आपण समजून घेतले पाहिजे, असे सावंत म्हणाले.

मी फक्त प्रादेशिक भाषाच शिकणार अशी आपली एक धारणा झालीय. पण प्रत्येकाला विविध भाषेचे ज्ञान हवे. नव्या शैक्षणिक धोरणात देखील प्रादेशिक भाषांसोबत हिंदीला प्राधान्य दिले जात आहे, असे सावंत म्हणाले.

आम्ही गोमंतकीय ज्यावेळी हिंदी बोलतो तेव्हा त्यात काही कोकणी आणि इंग्रजी शब्दांचा वापर असतो. हिंदी भाषिक भागात प्रचार करत असताना बऱ्याचवेळा माझ्या बोलण्यात इंग्रजी शब्दांचा वापर असतो. लोक मला विचारतात पण आम्ही कायम हिंदी बोलत नाही त्यामुळे काही इंग्रजी शब्द बोलण्यात येतात. पण, आता मी हिंदी व्यवस्थित बोलू शकतो, चांगले भाषण देऊ शकतो, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT