IFFI 2023  Dainik Gomantak
गोवा

54th IFFI 2023: इफ्फी महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावच्या रवींद्र भवनच्या सभागृहात होणार

54th IFFI 2023: तियात्रिस्तांचा प्रश्र्न मिटला; राजेंद्र तालक यांची स्पष्टोक्ती

दैनिक गोमन्तक

54th IFFI 2023: यंदाच्या इफ्फी महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावच्या रवींद्र भवनच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे भवनची दुरुस्ती, सुशोभीकरण आवश्यक असल्याने ३१ ऑक्टोबरपासून सभागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तियात्रिस्त भडकले होते.

मात्र, आता रवींद्र भवनचे सभागृह ६ नोव्हेंबरपर्यंत खुले केल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली आहे.

इफ्फीचे तांत्रिक अधिकारी ७ नोव्हेंबर रोजी रवींद्र भवनमध्ये चाचणी करणार आहेत. त्यानंतर दुरुस्ती व सुशोभीकरणाची दिशा ठरणार आहे, असेही तालक यांनी सांगितले.

तियित्रिस्तांना बोलावून किंवा संपर्क साधून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. ज्या तियात्रिस्तांच्या तियात्रांचे तीन शो झाले आहेत,

त्यांना नंतर संधी देण्यात येणार आहे. ज्यांचे तीनपेक्षा कमी शो झालेले आहेत त्यांना आधी संधी देण्यात येईल.

जे सर्वप्रथम तारीख निश्र्चित करतील त्यांना प्रथम संधी देण्यात येईल, त्याचबरोबर त्यांनी 24 तासांच्या आत सभागृहाचे भाडे भरणे आवश्यक असल्याचे तालक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT