Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनी अनुभवला महासोमयाग यज्ञ

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित अग्निष्टोम महासोमयागास रविवारपासून सुरवात झाली असून राजकीय नेत्यांपासून इतर स्तरांतील लोक तसेच भाविकगण उपस्थिती लावून यज्ञस्थळाचा आशीर्वाद घेताहेत. हा महासोमयाग शुक्रवार, 10 रोजीपर्यंत चालणार असून या यागाची सांगता अवधृत स्नानाने होणार आहे. बुधवारी चौथ्या दिवशी यज्ञस्थळी युपस्तंभाची स्थापना करण्यात आली.

सध्या अग्निष्टोम महासोमयाग अनुभवण्यासाठी भाविकांची यज्ञस्थळी मोठी गर्दी होत असून अध्यात्मासोबतच यज्ञ ही संकल्पना समजून घेणाऱ्यांची संख्याही चौथ्या दिवशी लक्षणीय होती. सोमयागातील प्रवर्ग्य विधी हा चित्ताकर्षित करणारा ठरतो.बुधवारी या प्रवर्ग्य विधीची समाप्ती झाली.

त्याचप्रमाणे महासोमयागस्थळी हवनकुंड अर्थात यज्ञवेदीला परिक्रमा करण्यासाठी हवनकुंडांना प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे.

सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मन:शांती तसेच आध्यात्मिक समाधानासाठी हा महासोमयाग यज्ञ सुरू असून बुधवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली.

या मान्यवरांनी दिली भेट : आतापर्यंत यज्ञस्थळी राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट दिली असून यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री सुदिन ढवळीकर, म्हापसा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, नगरसेविका नूतन बिचोलकर, माजी सरपंच अमिता कोरगावकर, वेर्ला-काणका पंचसदस्य वासुदेव कोरगावकर, भाजपचे संदीप साधले, माजी पोलिस अधीक्षक उमेश गावकर, कदंब वाहतूक महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे आदींनी भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT