Som Yag Yadnya 2023  Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023 : यज्ञस्थळी हे 5 स्टॉल्स वेधून घेतायंत सर्वांचे लक्ष

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात अग्निष्टोम महासोमयाग सुरू असून हा याग शुक्रवार, 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या यज्ञस्थळी चार स्टॉल्सही उभारले गेले आहेत. जिथे आयुर्वेदिक उत्पादनांसह अग्निहोत्रचे कीट खरेदीसाठी उपलब्ध केले आहेत. या स्टॉल्सना यज्ञस्थळी येणाऱ्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अग्निष्टोम महासोमयागच्या तिसऱ्या दिवशी भाविकांनी यज्ञस्थळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली व चित्ताकर्षित करणाऱ्या प्रवर्ग्य विधीची अनुभूती घेतली. मंगळवारी दिवसभर प्रवर्ग्य विधी व त्यानंतर वेदीकरण विधी झाले. त्याचप्रमाणे पुरोहितांनी दुपारच्या वेळी प्रवर्ग्य विधी झाल्यानंतर आतापर्यंत सोमयागमध्ये पार पडलेल्या विधींविषयी थोडक्यात माहिती दिली.

आपण या उत्सवासाठी आलो असून पहिल्यांदाच हा यज्ञ पाहत आहे. मला या ठिकाणी शांती मिळाल्याचे म्हापशामधील धनंजय शेट्ये यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

या उत्पादनांचा समावेश...

फेथ फूड्स ऑर्गेनिक इंडिया असे स्टॉल्स आहेत. जिथे नैसर्गिकरीत्या बनविलेले अन्नधान्य तसेच नमकीन खाद्यपदार्थ आहेत.

विश्व अग्निहोत्र साहित्य केंद्र शिवपुरीमधील स्टॉल्स आहे. जिथे अग्निहोत्रचे कीट त्याचप्रमाणे ‘विश्व’ची इतर उत्पादने आहेत.

ज्यात गाईचे तूप, गुलकंद, शेण व गोमूत्रने बनविलेले कापूर, अगरबत्तींचा समावेश आहे.

अग्निहोत्र हिंदी संस्करण, श्री लाइफ अ‍ॅण्ड वर्क, रिज्युवेनेशन ऑफ वेदास, अग्निहोत्र दी सिक्रेट ऑफ रेडिएंट लाइफ, एरा ऑफ लाइट आदी पुस्तके उपलब्ध आहेत.

संतुलन आयुर्वेद स्टॉल आहे. जिथे संतुलन च्यवनप्राश, संतुलन लोशन क्रिम, पावडर, तेल आदींचा समावेश आहे.

विविध पुस्तके विक्रीस

त्याचप्रमाणे मंडपात सकाळ बुक अ‍ॅण्ड पब्लिकेशन स्टॉलमध्ये सोमयाग यज्ञ उत्सवाचे प्रेरणास्थान श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांची विविध पुस्तके विक्रीस उपलब्ध आहेत. यात श्री गीतायोग शोध ब्रह्मविद्येचा अध्याय 15, फॅमिली डॉक्टर, श्रीमान प्रसन्न (कार्यसिद्धी), जय देवा गजानना, आयुर्वेदक गर्भसंस्कार आदींचा समावेश.

त्याचप्रमाणे शून्य श्री.एम. अनुवाद : अमेय नातू यांचे पुस्तक आहे. तसेच प्रफुल्ल वानखेडे यांचे ‘गोष्ट पैशा पाण्याची’ हेही पुस्तक उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT