Yuri Alemao Slams Goa Government  Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: 8 हजार मनरेगा कामगारांच्या मजुरीचा प्रश्‍न सोडवा युरी आलेमाव

Yuri Alemao: ‘एससी, एसटी, ओबीसींचा छळ’ : इव्हेंटवर उधळपट्टी थांबवा

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: एससी, एसटी आणि ओबीसी कामगारांसह मनरेगाअंतर्गत दररोज 322 रुपये कमावणारे जवळपास 8 हजार कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मी ऑक्टोबरमध्ये हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

दुर्दैवाने आजपर्यंत सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. इव्हेंटवर उधळपट्टी थांबवा आणि गरीब व कष्टकरी कामगारांची वेळेवर मजुरी द्या, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित मजुरी देण्यासाठी संबंधितांना आदेश देणे गरजेचे आहे.

दैनंदिन कमाईवर त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कष्टकरी कामगारांची मजुरी प्रलंबित ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, असे आलेमाव यांनी नमूद केले.

भाजप सरकार अर्थ खात्याची पूर्वमान्यता न घेता इव्हेंट व कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करते; पण गरीब कामगारांना मजुरी देण्यात खळखळ करते. रोजी-रोटीसाठी घाम आणि रक्त आटवणाऱ्या कष्टकरी गरीब कामगारांची मजुरी वेळेत न दिल्याबद्दल मी भाजप सरकारचा निषेध करतो. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT