Solapur Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Solapur Goa Flight: अखेर 15 वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर-गोवा विमानसेवेचा शुभारंभ, 'असं' असेल वेळापत्रक

Solapur Goa Flight Schedule: सोलापूरकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूर शहरात विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

सोलापूरकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूर शहरात विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. Fly91 या विमान कंपनीनं सोलापूर-गोवा दरम्यानच्या प्रवासाला हवेतील मार्ग उपलब्ध करून दिला असून, या सेवेमुळे स्थानिक नागरिकांसह व्यावसायिक आणि पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

आजपासून सुरू झालेल्या या सेवेचा पहिला टप्पा सोलापूर-गोवा आणि गोवा-सोलापूर असा आहे. ही विमानसेवा सोलापूर शहरातील होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून सुरू करण्यात आली आहे.

या सेवेचे उद्घाटन केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. उद्घाटन सोहळ्याला स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Fly91 कडून सध्या आठवड्याच्या चार दिवस विमानसेवा सुरू करण्यात आलीय. सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सोलापूर ते गोवा विमानसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही सेवा सुरू झाल्यामुळे सोलापूरकरांना पर्यटनासाठी गोव्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे किंवा रस्तामार्गावर अवलंबून राहावे लागणार नाही. विशेषतः उद्योगधंदा, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना या सेवेमुळे प्रचंड फायदा होणार आहे.

सोलापूर आणि गोवा यांना हवाई मार्गाने जोडणारी Fly91 ची विमानसेवा आजपासून सुरू झाली असून, यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विमानसेवेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले असून, आठवड्यातील सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही सेवा उपलब्ध असेल.

सोमवार आणि शुक्रवारचे वेळापत्रक

गोवा येथून सकाळी 7:20 वाजता विमान सोलापूरकडे उड्डाण घेईल आणि 8:30 वाजता सोलापूर विमानतळावर लँड होईल. त्यानंतर सोलापूरहून 8:50 वाजता विमान गोव्यासाठी उड्डाण घेणार असून 10:15 वाजता गोवा विमानतळावर पोहोचणार आहे.

शनिवार आणि रविवारचे वेळापत्रक

गोव्यातून विमान सकाळी 4:05 वाजता उड्डाण घेईल आणि 5:10 वाजता सोलापूर विमानतळावर उतरेल. सोलापूरहून परतीचे विमान सायंकाळी 5:35 वाजता गोव्यासाठी उड्डाण घेणार असून 6:50 वाजता गोवा विमानतळावर उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT