Sanjay Kole Gomantak Digital Team
गोवा

Pernem news : न्याय न मिळाल्यास आत्मदहन; संजय काले यांनी दिला इशारा

प्रकरणाची योग्य चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : मांद्रेचे आमदार जीत आरोलकार यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणी संदर्भात संशयिताविरूध्द पोलीसांनी कारवाई न केल्यास आत्मदहन करणार, असा इशारा समाज कार्यकर्ते संजय कोले यांनी आज दिला. दुसरीकडे, या प्रकरणाची योग्य चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार जीत आरोलकर यांच्या कार्यकर्त्यांनी मला माराहण केली व यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करुनही त्याची दखल घेण्यात येत नाही याच्या निषेधार्थ काले यांनी आज पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या धरणे कार्यक्रमाला अखिल गोवा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कामत, मांद्रे कॉंग्रेस गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर, नागरिक भास्कर नारुलकर, उदय महाले, ॲड. प्रसाद शहापूरकर आदी विविध संस्थांच्या प्रतिनिधीनी पाठिंबा दिला.

आरोलकरांविरुद्ध बोललो म्हणून..

काले म्हणाले, मी मोरजी येथे टॅक्सी स्टॅंडवर बसलो असता शेखर म्हापसेकर व नरेंद्र शेटगावकर या आमदार जीत आरोलकर यांच्या कार्यकर्त्यानी मी आरोलकरांविरोधात बोलतो म्हणून माझ्यावर हल्ला केला व मला जीवंत मारण्याची धमकी दिली. मी पोलीस तक्रार दाखल केली.

या घटनेस अकरा दिवस होत आले तरी अजून पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झालेला नाही. पोलीस खाते नेमके कुणासाठी आहे ? मी व्यथीत झालो असून न्याय न मिळाल्यास मी आत्मदहनाचा निर्णय घेणार, असे काले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT