Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: ...तर गोव्याच्या योगदानाने देश बाजरीचे जागतिक केंद्र बनेल!

कृषी संचालक ः म्हापशातील नाचणी फेस्तला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News आशियाई बाजारपेठेत 30-40 टक्के सहभाग असलेला भारत हा सर्वात मोठा बाजरी उत्पादक देश आहे. देशातील कृषी खाते बाजरी उत्पादनात 80 टक्के वाढ करत आहे. त्यामुळे देशाला बाजरीचे जागतिक केंद्र बनण्याची सुवर्णसंधी आहे. यात गोव्यातील शेतकऱ्यांनीही योगदान द्यावेस असे आवाहन कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी आज केले.

राज्यात बाजरीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, कृषी विभागाने म्हापसा येथील विभागीय कृषी कार्यालयाच्या धुळेर फार्ममध्ये नाचणीचे फेस्तचे आयोजित केले होते. या विविध क्षेत्रांतील लोकांनी सहभाग घेऊन बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले.

बाजरी ग्रामीण लोकांमध्ये लोकप्रिय होती. पण आता शहरी लोकांनाही जेवणात बाजरीचे पदार्थ हवे आहेत. कारण लोकांना त्याचे पौष्टिक मूल्य आणि औषधी मूल्य देखील समजले आहे, असे अल्फान्सो म्हणाले. या उपक्रमाला शेतकऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आता दरवर्षी होणार फेस्त

फेस्त दरम्यान अनेक स्टॉल्स लावले होते, जे विविध उत्पादने आणि बाजरीपासून बनवलेल्या विविध पाकृतींशी संबंधित होते. दिव्यांग व्यक्तींनींही स्टॉल्स मांडले होते. फेस्तदरम्यान शाळा व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

तसेच सहभागींना नाचणींचे लाभ घेण्यासाठी प्रात्यक्षिके दाखविली. यंदाचा प्रतिसाद पाहता कृषी खात्याने दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जाईल, असे घोषित केले.

गोव्याचे योगदान आता अल्प आहे, पण आम्ही उत्पादन वाढवू शकतो. राज्याची माती बाजरीच्या लागवडीसाठी योग्य आहे. कमी पाणी लागणारे हे पीक कोणत्याही हंगामात वाढू शकते.

गोव्यात सध्या 20 हेक्टर क्षेत्रांत बाजरीचे उत्पादन केले जात आहे. येत्या काही वर्षांत उत्पादनात 2 ते 3 पट वाढ करण्याचा आमचा मानस आहे.

- नेव्हिल अल्फोन्सो, कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT