Election Candidature Dainik Gomantak
गोवा

Election Candidature: निवडणुकीसाठी आतापर्यंत 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल

26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने पुढील तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी निर्वाचन अधिकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Election Candidature: राज्यात 40 मतदारसंघातील निवडणुकीसाठी आतापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. दाखल अर्जामध्ये भाजपचे 10, काँग्रेस 2, मगो 4 तर 5 अपक्षांचा समावेश आहे. 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने पुढील तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी निर्वाचन अधिकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी (Election Incharge) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 21 जानेवारीला तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात भाजप उमेदवार गोविंद गावडे (प्रियोळ) व निलेश काब्राल (कुडचडे) व अपक्ष उमेदवार दिग्विजयीत चव्हाण (नावेली) यांचा समावेश आहे. तर आज 24 रोजी 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

त्यात भाजपचे नीळकंठ हळर्णकर (थिवी), रोहन खंवटे (पर्वरी), नीलम खंवटे (पर्वरी), सुभाष शिरोडकर (शिरोडा), माविन गुदिन्हो (दाबोळी), मगोचे नरेश सावळ (डिचोली), दिपक ढवळीकर (प्रियोळ), केतन प्रभू (फोंडा), सुदिन ढवळीकर (मडकई) यांच्यासह पुजा मयेकर, विशाल नाईक, अजय बोयर व इजिदोर फर्नांडिस यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढून ते अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी होईल असा अंदाज आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने उमेदवारांना आयोगाच्या नियमांचे पालन करून प्रचार करावा लागणार आहे.

एका उमेदवाराचे दोन अर्ज दाखल

काही उमेदवारांनी दोन तर काहींनी आपल्या पत्नीचाही अर्ज दाखल केला आहे. आपला अर्ज छाननीवेळी रद्द झाला तर सावधगिरी म्हणून अनेक उमेदवार एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतात. उमेदवारी मिळालेल्या अनेकांनी अद्याप अर्ज दाखल केले नाहीत. शिवाय काही पक्षाच्या उमेदवारी यादी घोषित होण्याच्या बाकी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT