Bicholim Police Arrested sand Smuggler Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक; दोन ट्रक जप्त, चालकाला अटक

न्हावेली येथून रेती भरून दोन्ही ट्रक महाराष्ट्रात जात होते

दैनिक गोमन्तक

sand Smuggler : चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत दोन ट्रक जप्त केले. दोन्ही ट्रकांच्या संशयित चालकांनाही पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मुळगाव आणि डिचोली शहर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. न्हावेली येथून रेती भरून दोन्ही ट्रक महाराष्ट्रात जात होते, अशी माहिती मिळाली आहे.

या कारवाईमुळे डिचोलीत बेकायदेशीरपणे रेती व्यवसाय चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुळगाव येथे केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करताना एजे-२११२ या क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला. या ट्रकमध्ये ६ क्युबिक मीटर रेती होती.

पोलिसांनी ट्रक जप्त करून कुडाळ येथील प्रथमेश गोविंद म्हादाळकर (वय-२६) या ट्रक चालकाला आटक केली. डिचोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दुसऱ्या एका घटनेत डिचोली येथील कदंब बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करताना जीए-०९-यू-०९५१ या क्रमांकाचा ट्रक धरला. या ट्रकातही ६ क्युबिक मीटर रेती होती.

ट्रक ताब्यात घेवून कुडाळ येथील सुनील दिगंबर शेमाडकर (वय-३६) या ट्रक चालकाला अटक केली. डिचोली पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक हरीनाम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT