Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

स्मृती इराणींचा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवर पलटवार

स्मृती इराणी यांनी मुलीवर आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पवन खेरा, जयराम रमेश आणि नेट्टा डिसोझा या तीन काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच काँग्रेस पक्षाला बदनामी करण्याच्या तिरकस हेतूने कट्टर आणि भांडखोर वैयक्तिक हल्ल्यांची मालिका सुरू करण्याचा कट रचला आहे. नोटीसमध्ये भाजप नेते आणि त्यांच्या मुलीवर केलेल्या “निराधार आणि खोट्या” आरोपांसाठी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

(Smriti Irani sends legal notice to Congress national leaders over allegations against daughter)

स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात सुरू असलेल्या बारचा परवाना बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा परवाना बनावट पद्धतीने देण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या बार परवान्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे

याविरोधात आज गोव्यात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली.

याचबरोबर स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी युवा कॉंग्रेसच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांची मुलगी झोईश हिचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असून आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचे स्पष्टीकरण झोईश यांचे वकिल किरत नागरा यांनी दिले. झोईश यांनी देखील एका निवेदनाद्वारे अवैध रेस्टॉरंट, बारची मालकी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT