Smriti Irani Latest News Dainik Gomantak
गोवा

स्मृती इराणींच्या अडचणीत वाढ; गोव्यात युवक कॉंग्रेसतर्फे राजीनाम्याची मागणी

आज गोव्यात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली.

दैनिक गोमन्तक

स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात सुरू असलेल्या बारचा परवाना बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा परवाना बनावट पद्धतीने देण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या बार परवान्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे

याविरोधात आज गोव्यात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली.

याचबरोबर स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी युवा कॉंग्रेसच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांची मुलगी झोईश हिचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असून आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचे स्पष्टीकरण झोईश यांचे वकिल किरत नागरा यांनी दिले. झोईश यांनी देखील एका निवेदनाद्वारे अवैध रेस्टॉरंट, बारची मालकी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT