Smart City road Dainik Gomantak
गोवा

Smart City : सांतिनेजमधील रस्ते मंगळवारी वाहतुकीस खुले

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City :

पणजी, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) सांतिनेजमधील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

मुदतीपूर्वी सार्वजनिक वापरासाठी हे रस्ते खुले होणार आहेत आणि सांतिनेजमधून मधुबनकडे व काकुलो मॉलकडे जाणारे मार्ग मंगळवारी रात्री ९ वाजता खुले होणार असल्याने भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

विवांता चौक ते मधुबन कॉम्प्लेक्स, काकुलो मॉल चौक आणि तेथून पुन्हा वेलनेस मेडिकलपर्यंतच्या अशा दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी (ता. २८) रात्री हा रस्ता वाहतुकीला करण्यात येणार असल्याचे ‘आयपीएससीडीएल’ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

काकुलो मॉल जंक्शन एका बाजूच्या रहदारीसाठी बंद होणार आहे. तेथील काम अत्यंत गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे या जंक्शनवरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. जंक्शनवरील काम ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याचे प्रस्तावित आहे. परंतु कामाच्या क्युरिंगसाठी ७ जूनपर्यंत कालावधी लागेल, असे ‘आयपीएससीडीएल’ने नमूद केले आहे.

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत विकसित केलेले सांतिनेजमधील नवीन सुधारित रस्ते वाहतुकीसाठी खुले करताना आम्हाला आनंद होत आहे. रस्ते रुंदीकरण आणि विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह ही सुधारणा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सांतिनेजमधील लोकांच्या पाठिंब्याबद्दल आणि संयमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.

- संजीत रॉड्रिग्स, सीईओ-एमडी, ‘आयपीएससीडीएल’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT