Panjim |Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City: ‘स्मार्ट’ शहरांमुळे जीवनमान उंचावेल -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सर्व शहरांनी दीर्घकालीन महसूल मॉडेल निश्‍चित करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Smart City: स्मार्ट शहरे ही केवळ स्वप्ने किंवा सैद्धांतिक संकल्पना नसून, लोकांचे जीवनमान उंचावण्याची सर्वात मोठी संधी आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांवर आधारीत सर्व शहरांनी दीर्घकालीन महसूल मॉडेल निश्‍चित करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केले.

पणजीत स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या डेटा आणि तंत्रज्ञान परिषदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाले. या दोन दिवसीय परिषदेला देशभरातील शंभरहून अधिक स्मार्ट शहरांचे सीईओ उपस्थित होते.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या समन्वयाने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ही परिषद होत आहे. याप्रसंगी महापौर रोहित मोन्सेरात, अभियान संचालक कुणाल कुमार उपस्थित होते.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजीतील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, इलेक्ट्रिक बसेस, मांडवी प्रोमेनेड यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून महसूल निर्मितीला मोठा वाव आहे. असे आयपीएससीडीएलचे सीईओ मामू हागे यांनी सांगितले.

काही एजन्सींचे काम संथगतीने

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, त्याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, स्मार्ट सिटीचे वेगवेगळ्या एजन्सींना काम दिलेले आहे. त्यापैकी काही एजन्सींचे संथगतीने काम सुरू आहे.

स्मार्ट सिटींतर्गत ज्ञानसेतू, खारफुटीतील लाकडी पदपूल पूर्ण झाले आहे. सांतिनेज खाडीचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील काही प्रस्तावित कामांचे आराखडे तयार करून पाठविले आहेत, ते मंजूर होऊन येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT