Panjim Accident: रस्त्यात पडलेल्या भगदाडामध्ये चाक अडकून टँकर भररस्त्यात उलटल्याची घटना सांतिनेज टोक परिसरात दुपारी 12.30 च्या सुमाराला घडलीय. मागील पाच ते सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे दोन्ही बाजूंनी खोदकाम केले आहे.
अपघात घडला त्यावेळीही सदर काम सुरु होते. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. याच आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.
काही दिवसांपूर्वी चाक अडकून जांभ्या विटांची वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात उलटला होता. त्यावेळी 4 कामगार गंभीररीत्या जखमी झाले होते.
तसेच ट्रकची पुढची काचेचे नुकसानही झाले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती आज बघायला मिळाली. सदर टँकर क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
रस्त्याचे जागोजागी खोदकाम केले असल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. 'आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय', अशी तीव्र प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केलीय.
या घटनेचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.