Construction Work|Smart City Panjim Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: ...यामुळे पणजीतील कामे 15 मार्चनंतर बंद

पणजी महापालिका कार्यक्षेत्रात जी कामे सुरू आहेत, ती 15 मार्चपर्यंत चालतील, त्यानंतर ती बंद केली जातील.

दैनिक गोमन्तक

Construction Work|Panjim: ‘जी-20’ बैठकांच्या आयोजनाचा मान यंदा भारताला मिळाला आहे. या बैठकांपैकी एक बैठक गोव्यात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात तयारी सुरू आहे. त्यासाठी पणजी महापालिका कार्यक्षेत्रात जी कामे सुरू आहेत, ती 15 मार्चपर्यंत चालतील, त्यानंतर ती बंद केली जातील.

ही कामे 15 तारखेनंतर बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

पणजी महापालिका कार्यक्षेत्रात सध्या स्मार्ट सिटी मिशन तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत कामे सुरू आहेत. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि.तर्फे युनिव्हर्सल रोडचे काम सुरू केले आहे. स्मार्ट सिटीचेही काम करण्याची मुदत आता संपत आली आहे.

परंतु आता ‘जी-20’ बैठकीमुळे स्मार्ट सिटीचे काम थांबल्यास त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी ऑक्टोबरनंतरच वेळ मिळणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे साबांखातर्फे डांबरीकरण केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.

...अन्यथा नागरिकांचा रोष

यापूर्वीच स्मार्ट सिटीच्या सर्व सीईओंच्या बैठकीवेळी स्मार्ट सिटीच्या कामांविषयी आराखडा सादर केल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती महापौर मोन्सेरात यांनी दिली होती.

आता मार्चच्या मध्यालाच जर कामे बंद झाली आणि त्याच कामांसाठी पुनर्निविदा काढल्यास नागरिकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल, असे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT