Vikas Bhagat  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गाळ उपसा परवाना मागे घ्यावा : विकास भगत

Panaji News : जीसीझेडएमएने मुरगाव बंद प्राधिकरणाला धक्क्याच्या परिसरात सुमारे १९ मीटर खोल गाळ उपसण्यास परवानगी दिली आहे. यामुळे या बंदरात मोठी जहाजे कोळसा नेण्यासाठी येणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, गेल्या अनेक वर्षांपासून मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीसाठी विस्तार करण्यासाठी विरोध होत आहे. कोळसा वाहतुकीसाठीच दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. कोळसा वाहतुकीच्या प्रदूषणामुळे तेथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

त्यामुळे जीसीझेडएमएने मुरगाव बंदर प्राधिकरणाला (एमपीए) बंदरातील गाळ उपसण्यास परवाना दिला आहे तो मागे घ्यावा, अन्यथा हे प्रकरण गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदारांकडून आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असा इशारा पक्षाचे पर्यावरण कक्षाचे अध्यक्ष विकास भगत यांनी दिला.

जीसीझेडएमएने मुरगाव बंद प्राधिकरणाला धक्क्याच्या परिसरात सुमारे १९ मीटर खोल गाळ उपसण्यास परवानगी दिली आहे. यामुळे या बंदरात मोठी जहाजे कोळसा नेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा हातळणी या बंदराच्या धक्क्यावरून होणार आहे. त्याचा विपरित परिणाम निसर्ग व लोकांच्या आरोग्यावर होणार आहे.

मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. पर्यावरण आघात मूल्यांकनाचा अभ्यास न करताच जीसीझेडएमएने मुरगाव बंदर प्राधिकरणाला हा परवाना दिला आहे. त्यामुळे तेथील पारंपरिक मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात आहे. खारीवाडा समुद्रकिनारी असलेल्या वस्तीचे काय? मुरगाव बंदर प्राधिकरणाला हा फायदा करून देण्यामागील सरकारची भूमिका काय? हे स्पष्ट करावे, असे भगत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT